भाजप व शिवधर्म फौंडेशनने मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग भवन निवासस्थानाबाहेर त्यांचा पुतळा जाळत केले आंदोलन... बारामती:-भाजप व शिवधर्म फौंडेशनने मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मधील सहयोग भवन निवासस्थानाबाहेर त्यांचा पुतळा जाळत आंदोलन केले याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागपूर विधी मंडळ अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित
पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख केल्यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप व शिवधर्म फौंडेशनने पवार यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांचा पुतळा जाळत आंदोलन केले. बारामतीतल्या भाजप व शिवधर्मच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांचा पुतळा जाळला.यावेळी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. भाजपच्या वतीने भिगवण चौकात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र पोलिसांना गुंगारा देत अचानक कार्यकर्ते अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर एकत्र आले आणि जोरदार घोषणाबाजी करत पवार यांच्या पुतळ्याचे दहन केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
No comments:
Post a Comment