अवैध दारूवर बारामती तालुक्यात राज्य उत्पादन शुल्कची कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 10, 2023

अवैध दारूवर बारामती तालुक्यात राज्य उत्पादन शुल्कची कारवाई..

अवैध दारूवर बारामती तालुक्यात राज्य उत्पादन शुल्कची कारवाई..                                            बारामती:- नुकताच बारामती तालुक्यातील काही गावात अवैध दारू चालू असल्याची माहिती मिळाल्याने मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली. मौजे माळेगाव कारखाना, धुमाळवाडी रोड, लकडे नगर,पैठणकर नगर, पणदरे, झारगड वाडी, सोनगांव, माळेगाव खु", मेखळी इत्यादी ठिकाणी सकाळी ७ वा. छापेमारी करून एका चारचाकी वाहनासह विविध ठिकाणावरून अवैध हातभट्टी दारु विक्री व वाहतुकीसह एकूण चार आरोपीस अटक करण्यात आले. आरोपीचे नावे-(1) चेतन बाबु जाधव, रा. माळेगाव खु"(MH-14D-2657)2) नवनाथ सदाशिव गव्हाणे, रा. माळेगाव बु ॥(3) अभिमन्यु जनार्दन जाधव रा. माळेगाव धाकटे4) मंदा संभाजी कोळी, रा- धुमाळवाडी रोड, माळेगांव सदर आरोपीच्या ताब्यातून 345 लीटर हातभट्टी सह एकूण 3: 87,280/- चा दारुबंदी गुन्हयातील मुद्देमाल
विविध कलमाखाली अटक करून में न्यायालय बारामती येथील न्यायालयात दाखल करण्यात आले.वरील कार्यवाहीत मा. अधीक्षक श्री. सी. बी. राजपुत,उप-अधीक्षक श्री. एन. आर. पाटील, सर्वश्री निरीक्षक शेलार,श्री. बी.व्ही.ढवळे, टी.बी. शिंदे, सर्वश्री दुय्यम निरीक्षक श्री. एस. के. कान्हेकर, बी. बी. नेवसे, आर. डी. भोसले,
आर.की.झोळ, सुपकर, मांजरे, जवान संवर्ग श्री. थोरात, श्री पाटील, श्री. माळी, श्री. इंगळे, पावडे, वाकळे, माँडेकर,भोईटे, चव्हाण, कुछे,वाहनचालक श्री आबनावे, वामणे,
सिसोलेकर व महिला जवान प्रिया चंदनशिवे उपस्थित होते.या कारवाईमुळे बारामती तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशीच कारवाई चालू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment