धक्कादायक..अपर पोलीस अधीक्षक भोईटे यांच्यावर हत्या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका,वेतनवाढ रोखली.? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 15, 2023

धक्कादायक..अपर पोलीस अधीक्षक भोईटे यांच्यावर हत्या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका,वेतनवाढ रोखली.?

धक्कादायक..अपर पोलीस अधीक्षक भोईटे यांच्यावर हत्या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका,वेतनवाढ रोखली.?
पुणे:-नुकताच एका वृत्तपत्रात बातमी आली आणि पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली  याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत नगर उपविभागाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश राज्य सरकारने
दिले आहेत.भोईटे सध्या बारामती (पुणे) येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
संदीप वराळ यांच्या हत्येचा तपास करताना तत्कालीन तपास अधिकारी आनंद भोईटे यांनी दोन बनावट साक्षीदार उभे केले. त्यांचे जबाब नोंदवल्याचे कागदोपत्री दाखवले. वास्तविक पाहाता त्यातील एका साक्षीदाराचा घटनेपूर्वीच मृत्यू झालेला होता, तर दुसरा साक्षीदार घटना घडली तेव्हा दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास होता. या दोघांना या प्रकरणात साक्षीदार म्हणून दाखवले होते.या बनावट साक्षीदारांच्या जबाबावर या गुह्यातील
कटाचा आरोप असलेले बबन कवाद व मुख्तार
इनामदार यांनी आक्षेप घेतला व राज्य शासनाकडे तक्रार केली; परंतु त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती.न्यायालयीन सुनावणीनंतर बनावट साक्षीदार उभे केल्याप्रकरणी तपासी अधिकारी आनंद भोईटे यांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच, त्यांची खातेनिहाय चौकशी
करण्यास सांगितले.भोईटे यांनी संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात तात्पुरती स्थगिती मिळवली. गृह विभागाने भोईटे यांची चौकशी करून ते दोषी असल्याचा अहवाल राज्य सरकारला दिला. त्यानुसार राज्य सरकारने एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा
भोईटे यांना दिली.सरकारने केलेल्या कारवाईवर आम्ही समाधानी नाही वेतनवाढ रोखण्याची किरकोळ शिक्षा देऊन राज्य सरकार आनंद भोईटे यांना पाठीशी घालत आहे. ही बाब पुढील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या
निदर्शनास आणून देण्यात येईल. भोईटे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची आमची मागणी असल्याचे तक्रारदार मुख्तार इनामदार व बबन कवाद यांनी सांगितले आहे.भोईटे यांच्यावर गंभीर ताशेरे राज्यपालांच्या आदेशानुसार राज्य सरकारचे अवर सचिव चेतन निकम यांनी नुकताच हा आदेश दिला आहे. आदेशात भोईटे यांच्यावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. भोईटे यांनी या प्रकरणातील आरोपींना
त्रास होईल, या हेतूने कोणतीही शहानिशा व जबाबदारीचे भान न ठेवता चौकशी केल्याचे म्हटले आहे. तसेच, या घटनेमुळे या खून प्रकरणाच्या निकालावर गंभीर परिणाम होण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे. आनंद भोईटे यांनी केलेली चूक अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, अक्षम्य असल्याचे यापूर्वीच संभाजीनगर खंडपीठाने आपल्या निकालात म्हटलेले होते. त्यामुळे संभाजीनगर खंडपीठाने भोईटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश यापूर्वीच दिले
होते. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

No comments:

Post a Comment