रंगीबिरंगी पक्षांना प्रजासत्ताक दिवसानिमित्त आभाळमाया ग्रुप यांनी पिंजऱ्यातुन सोडून केले आझाद... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 26, 2023

रंगीबिरंगी पक्षांना प्रजासत्ताक दिवसानिमित्त आभाळमाया ग्रुप यांनी पिंजऱ्यातुन सोडून केले आझाद...

रंगीबिरंगी पक्षांना प्रजासत्ताक दिवसानिमित्त आभाळमाया ग्रुप यांनी पिंजऱ्यातुन सोडून केले आझाद...                                                           बारामती:- जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती हो बसेरा वो भारत देश है मेरा,मग पक्षी पिंजऱ्यात कसे बंद राहिला पाहिजे ज्यांच्या मधुर आवाजाने सकाळ आनंदमय होते  लहान मुलांना पक्षी पाहून  चेहऱ्यावर हास्य येतं अशा रंगीबिरंगी पक्षांना आज प्रजासत्ताक दिवसानिमित्त आभाळमाया ग्रुप बारामती यांनी पिंजऱ्यातनं सोडून आझाद करून प्रजासत्ताक दिवस दिन साजरा केला.
आभाळ ग्रुपच्या अध्यक्षा सौ. अल्पाताई भंडारी, सायली मोदी, अंजली देसाई, अर्चना भंडारी, हेमा ओसवाल, वैशाली मुथा, सपना शहा, शितल गुंदेचा, कविता गांधी, लता ओसवाल, मनीषा मुथा, मंजू बोराणा, मयुरी मुरूमकर, शितल मुथा, सुनिता मोदी, योगिता मुथा, सुरभी ओसवाल, आरती भंडारी, कल्पना ओसवाल, श्रद्धा दोशी, यांनी भारत माता की जय घोषणा देत प्रजासत्ताक दिन साजरा केला.

No comments:

Post a Comment