'बायको पेक्षा मैत्रिण बरी'.. चक्क लग्नासाठी केलं ब्लॅकमेलिंग.!
जळगाव :- पुरुष मंडळी किती किती नादात असतात याचे उदाहरण समोर आलंय,बायकोला घटस्फोट देऊन तिच्याच विवाहित मैत्रिणीला वारंवार मोबाईलवर फोन करून ब्लॅकमेलिंग करून लग्न करण्याची मागणी करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.पीडितेच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र सुभाष
पाटील, असे संशयिताचे नाव आहे. जळगाव शहरातील एका भागात २१ वर्षीय विवाहिता
आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खासगी
नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. या
विवाहितेसोबत कामाच्या ठिकाणी ओळख असलेल्या एका मैत्रिणीने पती जितेंद्र पाटील यांच्याशी घटस्फोट घेतलेला आहे, असे विवाहित महिलेला माहीत नव्हते.त्यामुळे जितेंद्र पाटील याने विवाहित महिलेशी ओळख निर्माण करून मोबाईल नंबर घेतला. पत्नीशी बोलायचे
आहे, असे सांगून वारंवार फोन करत होता. त्यानंतर मैत्रिणीचा आणि जितेंद्र पाटील यांचा घटस्फोट झाल्याचे विवाहित महिलेला समजले. त्यानंतर महिलेने मला कॉल करू नको, असे जितेंद्र पाटील याला समजावून सांगितले. तरीसुद्धा जितेंद्र पाटील हा वारंवार या विवाहितेला फोनवर बोलण्यासाठी धमकी देत होता. त्यानंतर माझ्याशी लग्न कर, असे म्हणत त्रास देऊ लागला. लग्न केले नाही तर मी तुझा संसार मोडून टाकेल.तुझ्याबद्दल तुझ्या पतीला बरे-वाईट सांगून गैरसमज पसरवून टाकेल, अशी धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करत होता. घडल्या प्रकाराबाबत पीडित विवाहितेने शनिवारी
(ता. २८) जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठत जितेंद्र पाटील यांच्याविरोधात तक्रार दिल्यावरून जितेंद्र पाटील यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment