*गुन्हेगारी प्रवृत्तीला व अवैध धंदे करणाऱ्यांना थारा नाही – गणेश इंगळे* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 16, 2023

*गुन्हेगारी प्रवृत्तीला व अवैध धंदे करणाऱ्यांना थारा नाही – गणेश इंगळे*

*गुन्हेगारी प्रवृत्तीला व अवैध धंदे करणाऱ्यांना थारा नाही – गणेश इंगळे*
गोरगरीबांना मायेचा आधार देणारा अधिकारी
बारामती:- "गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याकरिता पुणे ग्रामीण पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हेगार प्रवृत्तीला व अवैध धंद्याला थारा नाही असे मत बारामती चे उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांनी व्यक्त केले. "
   दि. १५ जानेवारी रोजी उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे व शेवराई सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, साहित्यिक, नामदेव भोसले, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली फाळके व भिगवंण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी म्हसोबाचीवाडी, ता. इंदापूर, पुणे येथील पिढीत कुटुंबातील आदिवाशी पिढीत महिला सारीखा काळे यांच्या भेटीसाठी आले होते. सारिका काळे जातीय भेदभावच्या द्वेशातुन अपमानीत वागणूक देत किरण दत्तू वणवे यांनी मारहाण केली होती. या झालेल्या प्रकाराची  उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांनी दखल घेतली. यावेळी इंगळे साहेब म्हसोबाचीवाडी येथील हरिदास पवार यांच्या घरी गेले. तेथे साहित्यिक नामदेव भोसले यांच्या आदर्श माता शेवराई ज्ञानदेव भोसले यांनी 
अतिशय कष्टमय जीवनातून आपले जिवन गरीबीशी  संघर्ष करुन आपल्या मुलांना घडवले अशा थोर मातेचा आर्शिवाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असे बारामतीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांनी सांगितले. यावेळी शेवराई सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष व साहित्यिक, नामदेव भोसले, प्रभाकर चांदगुडे, मनोज चांदगुडे, तात्या काळे, नितीन पवार, गौरीताई भोसले, सिंधु पवार, पोलीस हवालदार भोसले, पोलीस हवालदार साळवे, उपस्थित होते.

No comments:

Post a Comment