बापरे..सावकारांनी पुन्हा काढले डोके वर ,सावकारांची वाढतेय टोळी.! बारामती :- सावकारी कायदा आला त्यावेळी काही प्रमाणात सावकारांवर कारवाईही
करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील सावकारी काही प्रमाणात आटोक्यात येत असतानाच पुन्हा सावकारांनी पुन्हा लडोके वर काढल्याचे चित्र आहे.पुणे जिल्ह्यातुन कितीतरी तक्रारी दाखल असतील पण कारवाई कधी हा प्रश्न आहे?बारामती तुन देखील अनेक तक्रारी पोलीस अधीक्षक यांना दिल्याचे कळतंय पण त्याचं पुढे काय?असा विचारला जात आहे.पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात तर बारामती शहरात व तालुक्यांत फंडगट, बचतगट, भिशी या माध्यमांतून सावकारांनी कोट्यवधी व लाखो रुपयांचा ब्लॅकमनी भरमसाठ व्याजाने अनेकांना दिला असल्याचे समजते.तालुक्यात छोटे व्यापारी, भाजी विक्रेते, कामगार,मजूर,शेतकरी, कर्मचारी यांच्या गळ्याभोवती खासगी सावकारीचा पाश घट्ट होत आहे. मुद्दल रकमेपेक्षा व्याज अधिक घेऊ नये, कोऱ्या स्टॅम्पवर कर्जदाराच्या सह्या घेऊन कर्जवसुलीसाठी धमकी दिली जात असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात चर्चा होत आहे. शेतकऱ्यांचेच
शत्रू असणाऱ्या खासगी सावकारांना वेचून काढून
तुरुंगात डांबायचे धाडस सरकारने करणे गरजेचे
असल्याची चर्चेला उधाण येत आहे. अनेक सावकारांनी शेतकऱ्यांसह असाहाय्य लोकांच्या जमिनी, घरे, दागिने, वाहने कवडीमोलाने
घशात घातली आहेत. अडलेल्यांकडून कोरा मुद्रांक,धनादेशांवर सह्या घेऊन 25 ते 30 टक्के व्याजाने पैसे दिले जात आहेत. त्याचे भरमसाठ पद्धतीने व्याजही वसूल करून घेतले जात आहे. पैसे देताना सुरुवातीलाच व्याज कापून घेतले जाते.त्यानंतर भरमसाठ व्याज वसूल केल्यानंतर जमिनी,घरे जप्त केल्या जात आहेत. काहीजण पुढारी असल्याचे आव आणत त्या नावाखाली सावकारी सुरू आहे.सावकारांकडून वसूल केल्या जाणाऱ्या भरमसाठ व्याजामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.अनेकजण सावकारांचा तगादा आणि धमक्यांमुळे बेपत्ता झाले असल्याचे बोलले जात आहेत. अशा सावकारांचा बीमोड करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.आत्ताचं सरकार या बाबतीत काही ठोस पाऊलं उचलतो हे पाहणं गरजेचं असलं तरी पीडितांनी याबाबत पुढे आलं पाहिजे अश्या बलाढ्य व गुंडगिरी करणारे पांढरपेशी खाजगी सावकार यांच्यावर कडक कारवाई साठी विशेष मोहीम हाती घेतली पाहिजे..
... अन्यथा पाच वर्षांची कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंत दंड यापैकी एक किंवा दोनही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच परवाना प्राप्त करून घेताना हेतूपुरस्पर व जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती अर्जासोबत सादर केल्यास 2 वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा किंवा 25 हजारांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.तरतुदीपेक्षा जास्त व्याज आकारणी केल्यास प्रथम अपराधास 25 हजारांपर्यंत, तर नंतरच्या अपराधास 50 हजारांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. कर्जाच्या तरतुदीसाठी सावकाराने कर्जदाराचा विनयभंग,छळवणूक केल्यास 2 वर्षांपर्यंत कैद किंवा 5 हजारांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. या नव्या सावकारी कायद्यानुसार विनापरवाना व अवैध सावकारी केल्यास संबंधितांस 5 वर्षांपर्यंत शिक्षा आहे.
No comments:
Post a Comment