बारामती तालुका पोलीस स्टेशन ची मोठी
कारवाई;मोटरसायकली जप्त करत आरोपी अटक.!
बारामती:- बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरी करणारे चोर पकडले असून त्यांच्याकडून तब्बल 16 मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहेत. बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने या आधी अशाच प्रकारे 27 मोटरसायकल हस्तगत केल्या होत्या. त्याचीच
पुनरावृत्ती करत दि. 13/1/2023 रोजी पुन्हा एकदा मोटरसायकल चोर पकडून त्यांच्याकडून तब्बल 16 मोटरसायकल्स हस्तगत केल्या आहेत पुढे अजून तपास चालू असून आणखी मोटरसायकल हस्तगत होण्याची शक्यता आहे. गुन्हे शोध पथकातील अंमलदार राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक दराडे व पोलीस
कॉन्स्टेबल संतोष मखरे हे बारामती एमआयडीसी
, सूर्यनगरी परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना
आकाश संतोष नरूटे वय 20 वर्ष राहणार लालपुरी कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे. हा सूर्यनगरी बारामती परिसरामध्ये संशयितरित्या फिरताना मिळून आला त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो मोटरसायकल चोरी करीत असल्याबाबत माहिती मिळाली. त्याच्याकडे
कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याचे साथीदार 1)कौस्तुभ राजू गावडे वय 20 वर्ष राहणार कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे. (2 प्रथमेश तुकाराम पवार वय 20 वर्ष राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर (3 सोहन संतोष साठे वय 20 वर्ष राहणार माढा जिल्हा सोलापूर (4
रोहित सुभाष घोडके वय 20 वर्ष राहणार कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे. असे असल्याचे सांगितले व हे सर्व चोरटे बारामती, पुणे, हांडेवाडी, सातारा, शिंगणापूर,दहिवडी, टेंभुर्णी,सोलापूर, देवाची उरुळी, लोणंद
मोहोळ अशा विविध गावातून व शहरातून
मोटरसायकल चोरल्या असल्याबाबत त्याने माहिती दिली. यावरून सदर चोरटे यांना वडाळा सोलापूर येथून चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले चौकशीमध्ये वरील सर्व ठिकाणावरून गाड्या चोरल्याचे निदर्शनात आले त्यावरून त्यांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून सदरची कामगिरी मा. श्री अंकित गोयल सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण, मा. श्री आनंद भोईटे अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि योगेश लंगुटे, सहाय्यक फौजदार
कोलते. पो. हवा. राम कानगुडे, महिला पोलीस
हवालदार आशा शिरतोडे. पोलीस नाईक अमोल नरुटे,बापू बनकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, दीपक दराडे, दत्ता मदने शशिकांत दळवी यांनी केली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार राम कानगुडे पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे व दीपक दराडे हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment