बारामतीत नाराज राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 26, 2023

बारामतीत नाराज राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात..

बारामतीत नाराज राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात..
बारामती:-नुकताच बारामतीत शिंदे गटातील मंत्री, आमदार येऊन पवार कुटुंबाचे कौतुक करून गेले त्याला दोन तीन दिवस होत नाही तोच बारामती मधील राष्ट्रवादी चे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून शिंदे गटात गेले सुद्धा,याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुढील वर्षी लोकसभा निवडणुक होणार आहे.तसेच येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील प्रमुख शहरांच्या महापालिका निवडणुका होणार आहे. त्यावर राज्यातील राजकारणात अलिकडे अनेक नवी राजकीय समिकरणे जुळून आली आहेत.आता सर्वच राजकीय पक्षांकडून राजकीय पक्षप्रवेशांची मालिका सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. बारामतीतील शेकडो पदाधिकाऱ्यांनी
शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध
राजकीय पक्ष रणनिती आखताना दिसत आहेत.
त्याचाच भाग म्हणुन बारामतीतील शिंदे
गटातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाकडे पाहिले जाते.माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा मतदारसंघातील
इंदापूर तालुका, करमाळा, सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी,शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून या
पक्षप्रवेशा बाबतची माहिती दिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये
लिहिले आहे की, 'पुणे जिल्ह्यातील बारामती, दौड,इंदापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.' मंत्रालयातील बाळासाहेब भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर समन्वयक आशिष कुलकर्णी तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी व सहकारी यावेळी
उपस्थित होते.

No comments:

Post a Comment