बारामतीच्या तरुण युवकाचा खुन करणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात.. कुरकुंभ:-गेल्या काही महिन्यात खुनासारखे प्रकार घडल्याने व त्यातच एकाच कुटुंबातील सात जणांचा झालेला खून पोलीस प्रशासनाला एक आव्हान देऊन गेले व त्यातच पुन्हा एक तरुण युवकाचा खून झाल्याने आणखीनच पोलिसांवर ताण पडला असतानाचे त्याचे आव्हान स्वीकारत पोलीस प्रशासनाने त्वरित दखल घेत आरोपी पकडले याबाबत सविस्तर माहिती अशी की,दौंड तालुक्यातील जिरेगाव भोळोबावाडी रस्त्यालगत 29 जानेवारी रोजी प्रफुल्ल उर्फ मोनू राजेंद्र बारवकर (वय 26, रा. खंडोबानगर, मोरगाव रस्ता, बारामती) या तरूणाचा रक्तात माखलेला मृतदेह
आढळून आला होता. प्रफुल्ल हा खेड (ता. कर्जत,जि. नगर) येथील एका पेट्रोल पंपावर पर्यवेक्षक म्हणून कामाला होता. प्रफुल्ल याने 28 जानेवारी रोजी काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील बहिणीकडून घराच्या बांधकामासाठी तीस हजार रूपये आणले होते. काष्टी वरून दौंड मार्गे परतत असताना प्रफुल्ल याला त्याचे मित्र किशोर उर्फ मोन्या सोमनाथ खंडाळे (वय 23),शुभम उर्फ बाबा उद्धव कांबळे (वय 23) व गणुजी
उर्फ आबा रमेश खंडाळे (वय 26, तिघे रा. कुरकुंभ,ता. दौंड) भेटले. चौघांनी मद्यपान केले व त्यानंतर त्यांच्यामध्ये पैश्यांवरून वाद झाला. प्रफुल्ल बारवकर याला कुरकुंभ घाटाच्या खाली राखीव वन क्षेत्रात नेण्यात आले. रागाच्या भरात तिघांनी त्याच्या डोक्यात बोथट शस्त्राने मारले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्याकडील रोख रक्कम आणि काही चीजवस्तू काढून घेण्यात आल्या. त्यानंतर तेथून त्याचा मृतदेह उचलून स्त्यालगत टाकून देण्यात आला. दौंड पोलिस व पुणे
ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण
शाखेने तत्परतेने तपास करीत तिघांना ताब्यात घेत स्वतंत्ररित्या चौकशी केल्यानंतर खुनाचा उलगडा झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
No comments:
Post a Comment