वाळू माफियांवर धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कारवाई..
बारामती:- दिनांक २९/०१/२०२३ रोजी ०१:०५ वा. चे सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा
पुणे ग्रामीणकडील सहा. पो.नि राहुल गावडे, सहा फौज कारंडे, सहा फौज कोकरे, पो हवा / ४४
सचिन घाडगे, पो.हवा / १९६७ विजय कांचन, पो हवा / १८५२ एकशिंगे, पो हवा / २०५७ अहिवळे,पो.हवा / ४६९ नवले तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोसई शेलार, पो.कॉ./२३५७ नाळे, पो.कॉ. / १३८० जैनक असे मोरगाव मदत केंद्र येथे हजर असताना स.पो.नि राहुल गावडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे चांदगुडेवाडी ता. बारामती, जि. पुणे गावचे हददीत धरणवस्ती येथे कहा नदीपात्रात इसम नामे १) मनोहर शामराव चांदगुडे, २) विकास
बाबासो चांदगुडे, दोघे रा. धरणवस्ती, चांदगुडेवाडी, ता. बारामती, जि. पुणे हे दोघे त्यांचे साथीदारांसह बेकायदा बिगरपरवाना कहा नदीमध्ये चोरून वाळु उत्खनन करून चोरून नेत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळालेने पोलीस स्टाफ व पंच असे दोन खाजगी वाहनाने मिळाले बातमीचे ठिकाणी गेले असता तेथे एक लाल रंगाचा ट्रक मिळुन आला.सदर ट्रकवरील चालकास ट्रकमधील वाळुबाबत विचारणा केली असता, त्याने सदरची वाळु हि तुषार दत्तात्रय चांदगुडे व त्यांचे दोन भागीदार यांचेकडुन भरून आणले बाबत सांगीतले. तसेच सदर ठिकाणी दोन जे.सी.बी तेथील दोन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाळु उत्खनन करून चोरून भरत असताना व दोन ट्रॅक्टर डंपींग ट्रॉलीसह मिळुन आले. पोलीसांची चाहुल लागताच एक जेसीबी चालक अंधाराच फायदा घेवुन पळुन गेला व त्याचे इतर तिन साथीदार लाल रंगाचे चारचाकी वाहनामध्ये बसुन पळुन गेले. त्यानंतर जागीच मिळुन आलेल्या लोकांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) मनोहर शामराव चांदगुडे, वय ४६ वर्षे, रा. धरणवस्ती, चांदगुडेवाडी ता. बारामती, जि. पुणे, २) स्वप्नील ज्ञानेष्वर भोंडवे, वय २७ वर्षे, रा. आंबी खु।।, ता. बारामती, जि.पुणे, ३) विठठल तानाजी जाधव, वय २५ वर्षे, रा. आंबी खु।।, ता. बारामती, जि. पुणे, ४) अमोल
| शंकर सणस, वय ४६ वर्षे, रा. उरूळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे, ५) महादेव बाळु ढोले, वय ३८ वर्षे, रा. मोरगाव चौयथाळवस्ती, ता. बारामती, जि. पुणे असे असल्याचे सांगीतले. सदर ठिकाणी खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला.१) १०,००,०००/- लाख रू एक पिवळे रंगाचे जेसीबी कंपनीचे थ्रीडीएक्स मॉडेलचा मशिन नं. एम.एच.४२ ए.९२८३ जु.वा.की. अं.
२) ६,१०,०००/- लाख रू. हिरवे रंगाचा जॉनडिअर कंपनीचा ट्रॅक्टर नं. एम. एच.४२ वाय
७८०१ त्यास जोडलेली लाल रंगाची डंपीग ट्रॉली नंबर नसेलेली त्यामध्ये १ ब्रास वाळु भरलेली जु.वा.कि.अं.३) ३,००,०००/- लाख रू निळे रंगाचा सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर नंबर एम. एच. ४२ एफ ३९४२ त्यास निळे रंगाची डंपींग ट्रॉली मोकळी नंबर नसलेली २,५०,०००/– लाख रू किं. लाल रंगाचा महींन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर नं. एम. एच १३ जे ८०९६ त्यास लाल रंगाची डंपीग ट्रॉली मोकळी नंबर नसलेली जु.वा. किं.अं.
५) ६,१०,०००/- हिरवे रंगाचा जॉनडिअर कंपनीचा ट्रॅक्टर नं. एम. ४२ जे. एस. ४७६२ त्यास लाल रंगाची डंपीग ट्रॉली त्यामध्ये १ ब्रास वाळु भरलेली जु.वा. किं.अं.६) ८,००,०००/- लाख रू एक पिवळे रंगाचे जेसीबी मशीन थ्रीडीएक्स मॉडेलचे जेसीबी मशिन्. एम. एच.०९सी.एल २११ जु.वा. किं. अं.
७) १२,००,०००/- रू लाल रंगाचा टाटा कंपनीचा १६१३ मॉडेलचा ओपन बॉडी ट्रक नं. एम.
एच.१२ एच. डी. ७८११ त्यामध्ये ५ ब्रास वाळु जु.वा. किं. अं असा एकुण ४७,७०,००० /- रूपये किंमतीचा वरील वर्णनाचे जेसीबी मशीन, ट्रक व
| ट्रॅक्टर डंपीग ट्रॉलीसह जप्त करण्यात आलेले आहे. सदर बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण, मा.आनंद
भोईटे, अपर पोलीस अधीक्षक बारामती, मा. गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग बारामती, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि राहुल गावडे, सहा फौज कारंडे, सहा फौज कोकरे, पो हवा / ४४ सचिन घाडगे, पो. हवा / १९६७ विजय कांचन, पो. हवा / १८५२ एकशिंगे, पो हवा / २०५७ अहिवळे, पो.हवा / ४६९ नवले तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोसई शेलार, पो.कॉ./२३५७ नाळे,पो.कॉ. / १३८० जैनक यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment