महिला बचत गटाच्या माध्यमातून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाचा कार्यक्रम... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 16, 2023

महिला बचत गटाच्या माध्यमातून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाचा कार्यक्रम...

महिला बचत गटाच्या माध्यमातून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाचा कार्यक्रम...                                                 बारामती:- बारामती शहरातील टकार कॉलनी (क्षत्रिय नगर)येथे श्रीमती विजयालक्ष्मी महिला बचत गटाच्या माध्यमातून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास बारामती नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमाताई तावरे, माजी उपनगराध्यक्ष श्री अनिल नामदेवराव गायकवाड,सौ.अनिताताई गायकवाड अध्यक्ष- महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती, माजी  नगरसेविका सौ.शितलताई गायकवाड, अनिल लक्ष्मण गायकवाड (बाळासाहेब),सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मगनराव गायकवाड-उपाध्यक्ष-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बारामती शहर,महेंद्र सोपान गायकवाड ( सर),सौ. अश्विनी संदिप गायकवाड अध्यक्ष- महिला बचत गट) हे सर्व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे  यांनी महिलांना बराच वेळ देऊन महिलांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जानून घेतल्या. हळदी कुंकू या उपक्रमाचा उद्देश्यच महिलांनी एकत्र येवून विचारांची आदान प्रदान करणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मिलिंद गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment