५ फेब्रुवारी पासून टेंभूर्णी फेस्टिव्हलचे आयोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 27, 2023

५ फेब्रुवारी पासून टेंभूर्णी फेस्टिव्हलचे आयोजन..

५ फेब्रुवारी पासून टेंभूर्णी फेस्टिव्हलचे आयोजन..

टेंभूर्णी (प्रतिनिधी):- येथील बहुजन प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ५ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी या काळात "टेंभूर्णी फेस्टिव्हल 2023" या भव्य सांसकृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फेस्टिवलचे संयोजक व अध्यक्ष संतोष वाघमारे यांनी दिली.

फेस्टिव्हलचे यंदाचे यशस्वी सलग १९ वे वर्ष असून हा महोत्सव टेंभुर्णी शहरासह संपूर्ण माढा तालुक्यातील नागरिकांचे मुख्य आकर्षण बनला आहे. कला,ज्ञान, विद्यान, मनोरंजन, कृषी व औद्योगिक प्रदर्शन, सामाजिक प्रबोधनपर, अंधश्रधानिर्मुलन यावर आधारित प्रदर्शन, कार्यक्रमामध्ये
दि ५ . गायन स्पर्धा लहान गट
दि  ६ . डान्स  
दि‌ ७. गायन स्पर्धा मोठ गट
दि .८ भजन स्पर्धा 
दि . ९ तबला वादन स्पर्धा 
दि. ११ . फॅन्सी ड्रेस स्पर्धा लहान गट या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.तसेच  सांस्कृतिक कार्यक्रम आर्केष्ट्रा लावण्या, भारुड, लेझीम, वाघ्या मुरुळी या कार्यक्रमाबरोबरच एकेरी डान्स स्पर्धा ग्रुप डान्स स्पर्धा यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तर नागरिकांच्या व बाळगोपाळांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणा, दोन मारुती कारचा मौत का कुवा, बैंक इस पन्नालाल, सत्यम्बी चांदतारा, टोराटोरा, मिनी ट्रेन पैरकला, जादूचे प्रयोग इत्यादी साधने उभारण्यात येणार आहेत. हॉटेल्स व महिलांच्या खरेदीसाठी ज्वेलरी, संसार उपयोगी वस्तू लहान मुलांची खेळणी यांची १०० भव्य दुकाने उभारले जाणार आहेत. तसेच गृह उपयोगी वस्तू व कृषी उपयोगी अवजाराचे प्रदर्शनही या मध्ये आहे. कुर्डुवाडी रोडवरील भव्य मैदानात हा महोस्तव पार पडणार असून उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

बहुजन प्रतिष्ठान मार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आजवर मूणत माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील, डॉ. बाबा आढाव, अॅड. भास्करराव आव्हाड, साहित्यिक डॉ. आनंद यादव यासारखे विचारवंत भेट देऊन गेलेले आहेत. गेल्या तीन वर्षापासून सिने क्षेत्रातील कलावंत उद्घाटनासाठी हजेरी लावत आहेत.. प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी संस्थापक रघुनाथ वाघमारे. अध्यक्ष संतोष वाघमारे, विकास सुर्वे,गणेश पोळ,सोमनाथ नलवडे,हरिशचंद्र गाडेकर,धनंजय भोसल, झुंबर जाधव, सर्जेराव मुरकुले, योगेश दाखले, चंद्रकांत कुटे, पोपर सरडे,शरपुद्दीन मुलाणी,समाधान बोराटे, अमोल कुटे, अशपाक तांबोळी, विनोद आखाडे,दसरथ कसबे, रोहिदास बाघमारे, सुनील जगताप, बळू मोरे इ. कार्यकते परिश्रम आहेत. अधिक माहितीसाठी संतोष वाघमारे (९८२०१०८२१०) यांचेशी संपर्क साधन्याचे अहवान करण्यात आले आहे.
टीप - बातमीमध्ये आकाश पाळण्याचे संग्रहित छायाचित्र आहे.

No comments:

Post a Comment