पोक्सो कलमातील आरोपींची निर्दोष मुक्तता.. बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता की अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी केल्याने व नातेवाईकाना मारहाण करून विनयभंग केल्याचा आरोपाखाली झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले याबाबत मिळालेली माहिती अशी की, मार्च 2018 ते एप्रिल 2019 च्या दरम्यान आरोपींनी नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घातले नंतर तिच्या आई वडिलांकडून नकार मिळाल्यामुळे आरोपींनी भांडणे करून फिर्यादी मुलीच्या आई ,वडिल, मावशी ,काका यांना मारहाण केल्याचा, तसेच मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादी मुलीने केला होता. सदर खटला हा विशेष न्यायालयात जलद गतीने चालवणे करीता आरोपीचे वकीलांनी अर्ज केला असता तो अर्ज मंजूर करून सदर स्पे. खटला क्र. 40/2020 जलद गतीने चालवण्यात आला. भा. दं. वि कलम 354, 323, 324, 504, 506, 34
पोक्सो कलम 8, 12 मधून 4 आरोपींची (2 पुरूष , 2 महिला ) पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदरचा खटला मे. विशेष न्यायाधीश शहापुरे साहेब यांच्यापुढे चालवण्यात आला. सर्व आरोपींतर्फे अॅड. वनिता भोसले यांनी कामकाज पाहिले.
No comments:
Post a Comment