धक्कादायक.. बारामतीत प्रजासत्ताक दिनी कुटूंबियांचे आत्मदहन करण्याचा प्रयत्न...
बारामती:- बारामती शहरात 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन कार्यक्रम नंतर रेल्वे ग्राउंड येथे आयोजित चालू असताना अचानक मौजे निरावागज येथील दत्तात्रय शिवाजी भोसले व त्याची आई दोन लहान मुलीसोबत मैदानात आली आणि अचानक पेटवलेला हातात घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न करीत होता परंतु तेथील पोलीस प्रशासन यांनी हस्तक्षेप करून ही घटना थांबविली व त्यांना ताब्यात घेण्यात आले, याबाबत समजलेली माहिती अशी की अत्याचार ग्रस्त भोसले कुटुंबीय आज रोजी आत्मदहन करणार असले बाबत प्रांतअधिकारी व इतर प्रशासनास पत्र व्यवहार करण्यात आला होता तसेच आमच्या कुटुंबावर खूप दिवसापासून अन्याय अत्याचार होत असून कायदा आम्हाला न्याय देत नसल्याने व आमच्या अन्यायाला वाचा फुटत नसल्यामुळे आम्ही जीवनाला वैतागलो असून आमच्यावर सन 2005,2012, 2015, 2016, 2018, 2020 रोजी जीव घेणे हल्ले झाले असून गावच्या राजकीय हस्तक्षेपामुळे एकाही गुन्हात पोलीस कारवाई झाली नाही. त्यामुळे कायद्याचा धाक व कायद्याची भीती लोकांमध्ये राहिली नाही म्हणून शुल्लक कारणावरून कुरापती काढून आम्हाला त्रास दिला जात आहे.त्रास देणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांना राजकीय व्यक्तीकडून वाचवले जाते व आम्हाला चालत देखील बांधावरून जाऊन दिले जात नाही त्यामुळे आमचं जगणं मुश्कील झालं आहे त्यामुळे शेती करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे त्याला कंटाळून आम्ही शासनाला निवेदन देऊन वारंवार निवेदन देऊन आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही नैराश्यतून आमचे जीवन संपवण्याचा मार्ग निवडला आहे आम्ही आमच्या शेतात आत्महत्या करणार असून आमचा अंत्यविधी हा आमच्या शेतात व्हावा व आमच्या आत्महत्यास कारणीभूत त्रास देणारे संपूर्ण कुटुंबांना धरावे.अश्या आशयाचे बॅनर लावून आले होते याबाबत सविस्तर माहिती लवकरच प्रकाशित करू.
No comments:
Post a Comment