पुणे:-वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिस दलात लवकरच मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात येणार असल्याचे संकेत
मिळत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याचे सूतोवाच केले आहे.ते म्हणाले की, शहराच्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांना असलेल्या अधिकाऱ्यांच्या विषयामध्ये थोडं कोण-कोठे
उपयोगी राहिल हे डोळ्यासमोर ठेवुन पोलिस आयुक्त रचना करणार आहेत. पोलिस आयुक्त हे शहरातील परिस्थितीवर आणि प्रत्येक घटनेवर पुर्ण आणि बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणता अधिकारी कोठे उपयुक्त ठरेल याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहराच्या काही भागांमध्ये गुंडांनी धुमाकूळ घातला आहे तर काही ठिकाणी गुंडांच्या दोन गटांमध्ये तुफानी राडा झाला
आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना अटक देखील करण्यात आली आहे. दोनच दिवसांपुर्वी उत्तमनगर (वारजे) परिसरात दोन गुंडांच्या
गटांमध्ये तुबंळ हाणामारी झाली. त्यामध्ये कोयते,फरशी आणि दगडांचा वापर करण्यात आला. ही घटना घडली तेव्हा सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकारी भीमा कोरेगावच्या बंदोबस्तात होते. मात्र, त्यावेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी झोन-3 चे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्य
बोलताना सांगितले. शहरातील अनेक ठिकाणी खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास येते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर देखील दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशीच संबंधित अवैध व्यावसायिकाने दुकान थाटल्याची उदाहरणे देखील
आहेत. गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यापुर्वी शहरातील सर्वच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करायला हवी. मात्र, कारवाई सोडा पण उलट त्यांना प्रोत्साहन देणारे वसुली भाई प्रत्येक पोलिस ठाण्याच्या
हद्दीत कार्यरत आहेत.काही पोलिस अधिकाऱ्यांनी तर एक नव्हे दोन-दोन
कर्मचाऱ्यांची नियुक्ती कामकाज पाहण्यासाठी केली आहे. शहराच्या मोठ्या उपनगरांमध्येतर अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. पुणे शहरात सध्या स्पा आणि
मसाज पार्लरचे मोठे पेव फुटले आहे. स्थानिक पोलिस ठाण्यातील वसुली भाई आणि गुन्हे शाखेचे कामकाज पाहणाऱ्याला मॅनेज करून हा गोरखधंद्या जोरदार सुरू
आहे. अनेक पोलिस निरीक्षक 'तुपा'शी तर काही...पुणे शहर पोलिस दलातील काही निरीक्षक गेले 4-5 वर्ष कार्यकारी पदावर
म्हणजेच ए ग्रेडच्या पोलिस ठाण्यांचे प्रभारी म्हणून काम करत आहेत. संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक गंभीर घटना देखील घडल्या आहेत तर शहरातील प्रमुख काही उपनगरांच्या हद्दीमध्ये कोयता गँगने मोठा धुमाकूळ घातला आहे. पोलिसांकडून नागरिकांच्या अडचणी सोडविल्या जात नाही म्हणून काही वेळा पोलिस ठाण्यावर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. महत्वाच्या पोलिस ठाण्यांची हद्दीत सहासपणे बेकायदेशीर धंदे देखील सुरू असल्याचे पहावयास मिळते. नागरिक अवैध धंद्यांबाबत शहर नियंत्रण कक्षाला माहिती देतात. त्यानंतर सीआरओ अथवा संबंधित
पोलिस अधिकारी ज्या-त्या पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती देतात. त्यानंतर देखील त्याची संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ
पोलिस निरीक्षकांकडून दखल घेतली जात नाही.एवढेच नव्हे तर कंट्रोल रूमकडून अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास सांगण्यात आलेल्याचा अहवाल देखील नियंत्रण कक्षाला मिळत नाही. शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या आणि घटनांचा माहितीचा तक्ता
दररोज तयार केला जातो. त्याखाली याबाबतची माहिती दररोज संकलित करण्यात येत. तेथे देखील अमूक पोलिस स्टेशनला सांगून देखील कारवाई
अहवाल प्राप्त झालेला नाही असा शेरा लिहीलेला असतो. अशी सद्यपरिस्थिती आहे.वाहतूक शाखा, विशेष शाखा, आर्थिक गुन्हे आणि गुन्हे शाखेकडे साईड बॅच म्हणून पाहिले जात होते. मात्र, आता गुन्हे शाखेत नियुक्ती व्हावी यासाठी पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणावर धडपड सुरू असते.त्यामध्ये अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा शाखेत काम करण्यात मोठी धन्यता वाटत आहे.अलिकडील काळात गुन्हे शाखेत काही पोलिस निरीक्षक तर केवळ आणि केवळ तक्रारी अर्जांचा तपास करण्यात मग्न आहेत. गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करणे,गुन्हेगारांचा बिमोड करणे ही प्रमुख कर्तव्ये असलेल्या गुन्हे शाखेत आता केवळ अर्ज अन् चौकशा असाच प्रकारचे कामकाज पाहिले जात असल्याचे ऐकिवात आहे किंबहुना
अशाच प्रकारचे कामकाज सुरू असल्याची उदाहरणे देखील आहेत.अनेक चौकशांमध्ये गैरअर्जदारासोबतच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 'चॅटिंग' सुरू असते.
हे चॅटिंग काही वेळातर 'परमोच्च' स्तरावर जावून पोहचल्याची चर्चा आहे.
त्यामुळे गुन्हे शाखेत देखील पोलिस आयुक्तांना लक्ष घालावे लागेल असंच दिसतंय.लवकरच कोणाच्या कुठे बदल्या करण्यात आल्या हे समजेल.
No comments:
Post a Comment