धक्कादायक..उपचारासाठी आलेल्या महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 8, 2023

धक्कादायक..उपचारासाठी आलेल्या महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी..!

धक्कादायक..उपचारासाठी आलेल्या महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी..!
 पुणे :- महिला सुरक्षित नसल्याचे अनेक उदाहरणे पुढे येत असताना कायदा सुव्यवस्था बिघडते की काय अशी शंका उपस्थित होत आहे नुकताच उपचारासाठी अनेक दिवस रहावे लागणार असल्याने भाड्याने रुम दाखविण्याचा बहाणा करुन एका महिलेला पिस्तुलाचा
धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला
आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी संजय बाजीराव भोसले(वय ५२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याला अटक केली आहे. याबाबत गाझीयाबाद येथील एका ३९ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं.५३/२३) दिली आहे. हा प्रकार हडपसरमधील
जयप्रकाश सोसायटीत ५ जानेवारी रोजी दुपारी घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गाझीयाबाद येथील एक महिला मणक्याचा त्रास असल्याने उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आल्या होत्या.अनेक दिवस उपचार घ्यायचे असल्याने त्यांना राहण्यासाठी भाड्याने रुम पाहिजे होती. त्यांनी संजय भोसले यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने रुम दाखविण्याचा बहाणा करुन त्यांना जयप्रकाश सोसायटीत नेले. तेथे त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्यावर बलात्कार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास बघून घेईन, अशी धमकी दिली. हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment