धक्कादायक ..एकाच कुटुंबातील चौघांची
आत्महत्या..!
हडपसर:- सणासुदीच्या तोंडावर धक्कादायक घटना घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंढवा येथील केशवनगर परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांनी विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार
शुक्रवारी रात्री उघडकीस आला.दिपक थोटे (वय ५९), इंदू दिपक थोटे (वय ४५),मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (वय २४) आणि मुलगी समीक्षा (वय १७, सर्व रा. अंकुर कॉम्प्लेक्स,केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपक थोटे मुळचे
अमरावती येथील राहणारे आहेत. त्यांचा मुलगा
ऋषिकेश थोटे हा शेअर व्यवसायिक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते पुण्यात रहायला आले होते. त्यामुळे त्यांची फारशी कोणाला माहिती नाही. हे कुटुंबीय अंकुर कॉम्प्लेक्समध्ये तिसऱ्या मजल्यावर रहात होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना थोटे दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी दरवाजा वारंवार
वाजविल्यावर दरवाज्याची कडी सरकल्याचा आवाज आला. त्यांनी दरवाजा उघडला.
त्यावेळी त्यांना हॉल व किचनमध्ये कोणीही आढळून आले नाही.त्यांनी आतमधील बेडरुमच्या दरवाजातून आत पाहिल्यावर एका बाजूला तिघे जण व पायथ्याशी एक असे चार जण झोपलेले आढळून आले.त्यांनी तेथील एका डॉक्टरांना बोलावले. त्यांनी येऊन पाहिले
असताना चौघांचा मृत्यु झाल्याचे दिसून आले.
त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले.पोलिसांनी घरात तपासणी केली असता त्यांना रात्रीचे जेवण दोन भाज्या व चपात्या असे साहित्य आढळून आले. या व्यतिरिक्त घरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.पोलिसांनी चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहेत.आर्थिक कारणावरुन त्यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचा
पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment