राष्ट्रपुरुष मल्हारराव होळकर यांची १६ मार्च रोजी शासकीय स्तरावर जयंती सुरू करावी:- यशवंत ब्रिगेडची मागणी
बारामती:- मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचा सरदार सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील होळ मुरुम येथे झाला. मल्हाररावांनी पेशवाई आपल्या हातावर तोलून धरली त्या होळकर आणि शिंदे घराण्यापैकी होळकर घराण्याची स्थापना करणारा मूळ पुरुष मल्हारराव होळकर हे अटकेपार झेंडा रोवण्यापासून ते पानिपतच्या निर्णायक लढाईपर्यंत मराठी साम्राज्यासाठी लढत राहिले एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून इतिहास त्यांना कधी विसरणार नाही 16 मार्च 1693 मल्हाररावांचा जन्म झाला त्यांचे गाव पुणे नजीकचे होळ या गावावरून त्यांना होळकर हे ओळखले नाव मिळाले मल्हाररावांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठी साम्राज्याचे आधारस्तंभ बनले त्यांनी शिपाई ते थेट सरदार असा प्रवास केला १७२८ ची निजामाबरोबरची महत्त्वाची लढाई असो तसेच १७३८ सालची भोपाळची लढाई असो मल्हार रावांची समशेर कायम तळपत राहिली आणि त्यांना "किंगमेकर" म्हणून ओळखले जाऊ लागले मराठा साम्राज्यातील एक सोनेरी पान म्हणजे" अटकेपार झेंडा" पाकिस्तानातील अटकपर्यंत स्वराज्याचा भगवा झेंडा जाऊन पोहोचला होता अटक काबीज करण्याआधी १७५८ सरहिंद आणि लाहोर देखील काबीज करण्यात आले स्वराज्य राखण्यात ते वाढविण्यात मल्हाररावांनी आपल्या आयुष्य पणाला लावले मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावन्यात त्यांचा मोठा हात होता अशा या महान योद्धा ची शासकीय स्तरावर १६ मार्च या दिवशी जयंती साजरी करण्यात यावी. अशी मागणी यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापुराव सोलनकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
No comments:
Post a Comment