*राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे खंडपीठ सुनावणीसाठी दोन दिवस मुंबईत येणार* - vadgrasta

Post Top Ad

Friday, January 6, 2023

*राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे खंडपीठ सुनावणीसाठी दोन दिवस मुंबईत येणार*

*राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे खंडपीठ सुनावणीसाठी दोन दिवस  मुंबईत येणार*

*महाराष्ट्र राज्याशी संबंधित 42 प्रकरणाची सुनावणी..*

 मुंबई:- महाराष्ट्र राज्याशी संबंधित राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली यांचेकडे दाखल  ४२ प्रकरणे अंतिम सुनावणीसाठी सह्याद्री राज्य अतिथीगृह, महाराष्ट्र शासन, मुंबई येथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दोन दिवस शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 
आयोगाच्या प्रस्तावित शिबिराच्या वेळा 11.01.2023 आणि 12.01.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता असून  संबंधित सार्वजनिक / शासकीय अधिकार्‍यांना नियोजित तारखेला आयोगासमोर, वर नमूद केलेल्या ठिकाणी त्यांच्या प्रतिसाद/अहवालांसह उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
यामधे माझी दोन प्रकरणे अंतिम सुनावणीसाठी ठेवली असून
1) जालना जिल्ह्यातील एका नागरिकाला पोलिसानी मारहाण केल्याबाबत व
2) अमरावती जिल्ह्य़ातील फॉरेस्ट विभागातील महिला रेंज फॉरेस्ट ऑफिसर  यांच्या आत्महत्या बाबत आहे.
याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मला ईमेल द्वारे कळविले आहे. 

तुषार झेंडे पाटील, 
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, महाराष्ट्र प्रांत. 9545594959

No comments:

Post a Comment