बापरे..१४ व १० वर्षाच्या मुलींना ज्यांच्या भरवशावर सोपवले;त्यांनीच याचा गैरफायदा घेत दोन्ही मुलींवर केला बलात्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 22, 2023

बापरे..१४ व १० वर्षाच्या मुलींना ज्यांच्या भरवशावर सोपवले;त्यांनीच याचा गैरफायदा घेत दोन्ही मुलींवर केला बलात्कार..

बापरे..१४ व १० वर्षाच्या मुलींना ज्यांच्या भरवशावर सोपवले;त्यांनीच याचा गैरफायदा घेत दोन्ही मुलींवर केला बलात्कार..                               पुणे:- महिला, मुली सुरक्षित नसल्याचे अनेक उदाहरणे समोर येत असताना धक्कादायक घटना समोर आली माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली पुणे येथे याबाबत मिळालेली माहिती अशी की,आईवडिल त्यांच्या भरोशावर आपल्या १४ व १० वर्षाच्या मुलींना सोपवून गेले होते.त्यांनीच याचा गैरफायदा घेत दोन्ही मुलींवर बलात्कार केला. त्याच्या मित्रानेही १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी एका समाजसेविका महिलेने खडक पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु.रजि. नं. ३८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील आईवडिल दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे आरोपी हा त्यांच्याकडे रहायला आला. त्याने शनिवारी दुपारी या दोन मुलींवर
बलात्कार केला. त्यापूर्वी २० दिवस अगोदर आरोपीने १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. हा प्रकार शेजारी असलेल्या फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक नाईक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment