धक्कादायक..मुंबई उच्च न्यायालयाने मा. सरपंच पोपट तावरे व इतर पोलीस अधिकारी यांनी बारामती येथील सत्र न्यायालयात केलेल्या अर्जाला दिली स्थगिती... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 9, 2023

धक्कादायक..मुंबई उच्च न्यायालयाने मा. सरपंच पोपट तावरे व इतर पोलीस अधिकारी यांनी बारामती येथील सत्र न्यायालयात केलेल्या अर्जाला दिली स्थगिती...

धक्कादायक..मुंबई उच्च न्यायालयाने मा. सरपंच पोपट तावरे व इतर पोलीस अधिकारी यांनी बारामती येथील सत्र न्यायालयात केलेल्या अर्जाला दिली स्थगिती...                                         बारामती:-मध्यंतरी बारामती, दौड तालुक्यात एक खळबळ जनक बातमी आली यामध्ये माजी सरपंच,डी वाय एस पी,पोलीस निरीक्षक, तपासी अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळाले, तद्नंतर यांनी बारामती येथील सत्र न्यायालयात प्रकरण सादर केले होते अशी माहिती मिळते, याबाबत मिळालेली माहिती अशी की  फिर्यादी नामे किरण भोसले व आरती लव्हटे यांनी नामे पोपट तावरे व इतर यांच्या विरोधात यापूर्वी अनुक्रमे गु. र. क्र. 1017/21,1018/21,1020/21
यवत पोलीस स्टेशन येथे दाखल केले होते. प्रस्तुत च्या गुन्ह्याचा तपास करून तपासी अधिकारी यांनी मे. कोर्टात चार्जशीट दाखल केले व ते दाखल करताना तपासी अधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ संबंधित अधिकारी यांनी योग्य पद्धतीने तपास केलं नाही, आणि त्यांचे असणारे कायदेशीर कर्तव्य बजावताना कसूर
केला तसेच आरोपीशी संगणमत केले म्हणून सदरील फिर्यादी यांनी दौंड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सो. यांचे कोर्टामध्ये फौजदारी मिसलीनियस एप्लीकेशन 109/2022 हे नामे पोपट तावरे, डी वाय एस पी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि तपासी अधिकारी पद्मराज गंपले यांचे विरोधात दाखल केले होते. प्रथम दर्शनी फिर्यादीच्या फिर्यादीमध्ये सत्यता असल्याकारणामुळे न्यायालयाने सदरील आरोपी यांच्या विरोधात CRPC Sec. 156(3) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश यापूर्वी
दि.21/9/2022 रोजी केले होते. त्यानुसार यवत पोलीस स्टेशन येथे दि.28/9/22 रोजी गुन्हा
रजिस्टर क्रमांक. 807/22 हा दाखल करण्यात आला होता. प्रस्तुत दौंड येथील मे. प्रथम वर्ग न्यायाधीश यांच्या आदेशावर व्यथित होऊन, आरोपी यांनी बारामती येथील सत्र न्यायालयात क्रिमिनल रिव्हिजन अर्ज क्रमांक 46/22
हा दाखल केलेला होता व आहे. त्या अर्ज अन्वये बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दि.३०/९/२२ रोजी अंतरिम स्थगिती देण्याचा आदेश दौंड येथील प्रथम वर्ग न्यायालयास दिलेला होता. या आदेशाने व्यथित होऊन मूळ
फिर्यादी यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केलेली होती व आहे
. प्रस्तुत रिट पिटीशन मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मूळ फिर्यादी यांची बाजू
ऐकून घेऊन. बारामती येथील सत्र न्यायालयाने केलेल्या आदेशात अंतिरिम स्थगिती दि. 24/1/23 पर्यंत दिलेली आहे.न्यायालयामध्ये फिर्यादी यांची बाजूने अॅड. शैलेश चव्हाण, अॅड. राजेश कातोरे,अॅड. अमित काटे यांनी कामकाज पाहिले असल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले.

No comments:

Post a Comment