स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुण पिढीपुढे आजही दिशादर्शक-अंकिताताई पाटील ठाकरे* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 12, 2023

स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुण पिढीपुढे आजही दिशादर्शक-अंकिताताई पाटील ठाकरे*

*स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुण पिढीपुढे आजही दिशादर्शक-अंकिताताई पाटील ठाकरे*

बारामती:- बारामतीमध्ये मल्हार क्लबच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांची 160वी जयंतीचा आयोजन करण्यात आले होते .यावेळेस राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. 
स्वामी विवेकानंद हे भारताला लाभलेलं अतिशय महान व्यक्तिमत्त्व होतं त्यांच्या सामर्थ्यशाली आणि प्रगल्भ व विचारामुळेच भारताची प्रतिमा जगाच्या पाठीवर उंचावली. भारताला जगाच्या पाठीवरती सामर्थ्यशाली व मजबूत राष्ट्र बनवायचे असेल तर विवेकानंदांच्या विचाराचे तरुण पिढीने अंगिकार केला पाहिजे असे प्रतिपादन युवा नेतृत्व अंकिताताई पाटील ठाकरे यांनी केले. यावेळेस बारामतीचे प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांनीही विवेकानंद यांच्या बद्दलचे अतिशय महत्वाची माहिती दिली.
   स्वामी विवेकानंद यांना फक्त 39 वर्ष आयुष्य मिळाले, या कमी अवधीत सुद्धा देशाला त्यांनी जो विचार आणि कृतिशील कार्यक्रम रामकृष्ण मिशन च्या माध्यमातून दिला तो खऱ्या अर्थाने पुढील शेकडो वर्षे पुरेल अशी भूमिका कार्यक्रमाची व्याख्याते रघुवीर (भैय्या) पाटसकर यांनी मांडली. यावेळेस बारामती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष रोहित घनवट यांनीही मेंटल फिटनेस या अतिशय आजच्या पिढीला गरज असणाऱ्या विषयावरती मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप शिंदे, माणिकराव दांगडे सर,भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्रजी खांडरे,शहराध्यक्ष सतीश फाळके,डॉ.अमृता वाघचौरे,अविनाश देवकाते, राजेश कांबळे,सुनील देवकाते, विठ्ठल देवकते,माऊली मारकड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मल्हार क्लबच्या माध्यमातून ॲड.गोविंद देवकाते,बापूराव सोलंनकर,देवेंद्र बनकर,सारिका आटोळे व टीमने केले होते.

No comments:

Post a Comment