धक्कादायक..गुंगीचे औषध पाजून बालगृहातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार..
लातूर:- बालविकास विभागाच्या एका निरीक्षण बालगृहातील अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे. दरम्यान,या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीच्या
मैत्रिणीसह पाच जणांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका महिलेला अटक देखील करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षण बालगृहातील एक मुलगी एका महविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत असून, तिची आठवीपासूनची एक मैत्रीण तिच्याच सोबत शिक्षण घेत आहे. दरम्यान,
बुधवारी 18 जानेवारीला या दोघी मैत्रिणी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गप्पा मारत होत्या. यावेळी पीडीत मुलीच्या मैत्रिणीच्या आणखी दोन मैत्रिणी तिथे आल्या होत्या.यावेळी त्यांनी पार्टी करू म्हणून या दोघींना सोबत चालण्याची विनंती केली. त्यामुळे पीडीत मुलगी आणि तिची मैत्रीण त्या मैत्रिणीसोबत जाण्यास तयार झाल्या.पार्टीला जाण्याचे ठरल्यावर आलेल्या मैत्रिणीने तिच्या पतीला बोलावून घेतले. त्यानंतर मैत्रिणीचा पती तिथे ऑटोरिक्षा घेऊन आला. रिक्षाचालकासह पाच जण अंबाजोगाई मार्गावरील एका शेतात गेले. तिथे सर्वजण रिंगण करून बसले. यावेळी मैत्रिणीच्या नवऱ्याने एक बाटली काढून पित बसला. दरम्यान याचवेळी रिक्षाचालकाने एका बाटलीतील गुंगीचे औषध बालगृहातील मुलीला जबरदस्तीने पाजले. त्यानंतर रिक्षाचालकाने मुलीला बाजूला नेऊन अत्याचार करायला सुरवात केली. विरोध केल्यानंतर त्याने तिला
मारून टाकण्याची धमकी दिली. यातच मुलीला गुंगी आली. जाग आली तेव्हा ती बालगृहात होती.बालगृहात आलेल्या पीडीत मुलीला शुद्ध आल्यावर तिला याबाबत विचारणा केली असता, तिने या घडलेल्या घटनेची माहिती बालगृह प्रशासनाला दिली.त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर तीनपैकी एका मैत्रिणीला अटक केली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर लातूर जिल्हा या घटनेने हादरलं आहे.
No comments:
Post a Comment