धक्कादायक..भोंदू बाबा महिलेवर वारंवार करत होता बलात्कार;अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून.!* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 3, 2023

धक्कादायक..भोंदू बाबा महिलेवर वारंवार करत होता बलात्कार;अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून.!*

 *धक्कादायक..भोंदू बाबा महिलेवर वारंवार करत होता बलात्कार;अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून.!*                                                                                               नाशिक :- एक धक्कादायक घटना   समोर आलीय. अंगात दैवी शक्ती असल्याचे    सांगत तसेच आमिष दाखवून एका भोंदू बाबाने महिलेवर अत्याचार केला.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात भोंदू बाबासह त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.नाशिकच्या उपनगर परिसरात राहणाऱ्या एका भोंदूबाबाने अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा याने एका महिलेवर त्याच्या राहत्या घरी आणि इतर ठिकाणी वारंवार महिलेच्या
संमतीविना शाररिक संबंध केले. याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत आणि अंगात दैवी शक्ती असल्याचे
भासवले होते. तसेच घर घेऊन देण्याचे आमिष दाखून महिलेकडून सुमारे ५ लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याचे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. या संपूर्ण घटनेत विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा याची पत्नी,मुलगा आणि मुलगी यांचा देखील समावेश असल्याने देवबाबासह त्याची पत्नी सुनिता विष्णु वारुंगसे, उमेश विष्णू वारुंगसे व आणि देवबाबा याची मुलगी अश्या चौघांविरोधात उपनगर पोलिसांत ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने जादूटोणा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.तर आरोपी फरार असून उपनगर पोलिस अधिक तपास करत आहे.

No comments:

Post a Comment