नगरपरिषदचे मुख्याधिकारी,अभियंता, लिपिक 1 लाख 75 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात.. कोल्हापूर :- लाच घेताना अधिकारी कसे सापडतात याचे अनेक उदाहरणे आहेत नुकताच एका नगरपरिषदे मधील बांधकाम परवाना फाईल तपासुन पुढे पाठवणे करता शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता, लिपिक आणि खासगी व्यक्ती यांना 1 लाख 75 हजार रुपये लाच स्वीकारताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शिरोळ नगरपरिषदेत खळबळ उडाली आहे. कोल्हापूर एसीबीने ही कारवाई सोमवारी (दि. 27 ) केली.
शिरोळ नगरपरिषद शिरोळ मुख्याधिकारी अभिजीत मारुती हराळे (वय 33 रा. भिलवडी, ता. पलूस, जि.सांगली), कनिष्ठ अभियंता संकेत हणमंत हंगरगेकर(वय 28 सद्या रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ मूळ रा. उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद), लिपिक सचिन तुकाराम सावंत (रा.शिरोळ, जि. कोल्हापूर), खाजगी व्यक्ती
अमित तानाजी संकपाळ ( वय - 42 रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी लाचखोरांची नावे आहेत. याबाबत 42 वर्षाच्या व्यक्तीने कोल्हापूर
एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे बांधकाम परवाना फाईल तपासुन पुढे
पाठवणेकरीता कनिष्ठ अभियंता संकेत हंगरगेकर
आणि लिपक सचिन सावंत यांनी तक्रारदार यांचेकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली.
तर मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी तक्रारदार याची फाईल मंजूर करून बांधकाम परवाना देणेसाठी 75 हजार रुपये लाच मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी कोल्हापूर एसीबीकडे तक्रार केली. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे पोलीस निरीक्षक नितीन कुंभार , पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर,पोलीस अंमलदार विकास माने, मयूर देसाई, रुपेश माने, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment