खळबळजनक..राष्ट्रवादीचे आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवत मागितली 1लाखाची खंडणी..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 10, 2023

खळबळजनक..राष्ट्रवादीचे आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवत मागितली 1लाखाची खंडणी..!

खळबळजनक..राष्ट्रवादीचे आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवत मागितली 1 लाखाची खंडणी..!

पुणे:-सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढताना दिसत असताना या प्रकारातून अनेकांचे जीव गेले तर कित्याकाचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे दिसले. त्यामुळे सेक्सटॉर्शनच्या प्रकार वाढताना दिसत असतानाच काळजी घेणे गरजेचे आहे, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोहोळचे आमदार
यशवंत माने यांना सेक्सॉर्टशनमधून खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,सोलापूर मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांचा
मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर मिळवून त्यांच्याशी व्हाट्सअपवर संपर्क करून वेळोवेळी अश्लिल संदेश पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.तसेच अश्लिल व्हिडिओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला गेला. हा कॉल रेकॉर्ड करून त्यांच्या फेसबुकवरील मित्रांना पाठविण्याची धमकी देऊन 1 लाख रुपयांच्या
खंडणीचीही मागणी आरोपींनी केली.
इतकेच नव्हेतर हा अश्लील व्हिडिओ
कॉल सोशल मीडियावर व्हायरल
करण्याची धमकी दिल्याचीही माहिती
समोर आली आहे.या गुन्ह्यातील आरोपीने वापरलेल्या मोबाइल लोकेशनवरून आरोपी
भरतपूर राजस्थानमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलिसांनी शोध घेत आरोपी रिझवान अस्लम खान याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, आरोपीकडून 4 मोबाईल व 4
सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
तसेच जप्त केलेल्या मोबाईलमध्ये स्क्रिन रेकॉर्ड केलेल्या 90 अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. या आरोपीला न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस
कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment