सावकाराचा अजब कारभार..15 हजारच्या बदल्यात 50 हजार फेडले,तरी शरीरसंबंधासाठी महिलेची मागणी करून छळ..!
कोल्हापूर:-वाढती सावकारी व कित्येकांचे झालेले वेगवेगळ्या घटना याचे ताजे उदाहरण असतानाच नुकताच एक घटना घडली, अवघ्या 15 हजार रुपयांच्या कर्जापोटी 50 हजार रुपयांची कर्जाची परतफेड करूनही अश्लील मागणी करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या देणाऱ्या चिंचवडमधील खासगी सावकाराला अटक करण्यात आली आहे.योगेश राजगोंडा पाटील (रा. चिंचवड, ता. करवीर) असे या खासगी सावकाराचे नाव असून न्यायालयाने त्याला
चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
खासगी सावकार योगेशने राकेश मनोहर मगदूम (वय 38 रा. चिंचवड ता.करवीर) यांना 15 हजार रुपये 10 टक्के व्याजाने दिले होते. राकेश यांनी महिना पंधराशे रुपये याप्रमाणे 10 हजार 500 रुपये परत केले होते. तसेच संशयित योगेशच्या दारू पिण्याचे हॉटेलचे बिल वेळोवेळी 39,750 भागवले होते. असे मिळून 50 हजार 200
रुपये दिले. तरीही योगेश वारंवार कर्जाच्या रकमेबाबत राकेश यांच्याकडे तगादा लावून रक्कम दे नाही, तर जीवे मारू अशी धमकी देत होता. तसेच शरीरसंबंधासाठी नातेवाईक महिलेची मागणी करून छळ केला.कोल्हापुरात सावकारी बोकाळली असून कडक कारवाईची मागणी होऊ लागली आहे.
No comments:
Post a Comment