सोरतापवाडी गावाला मिळाला नवीन पिनकोड- 412202....
पुणे:- तारीख 10.02.2023 टपाल विभागा तर्फे सोरतापवाडी येथे शाखा डाक घर दिनांक 01.11.2022 पासून सुरु करण्यात आले. पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल श्री रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते या शाखा डाकघराचे उदघाटन करण्यात आले. हवेली तालुक्यात पुणे ग्रामीण
टपाल विभागाच्या उरुळीकांचन या उपडाकघरा अंतर्गत सोरतापवाडी हे शाखा डाकघर सुरु करण्यात आले.पूर्वी सोरतापवाडी या गावाचा पिनकोड 412110 हा होता. दिनांक 01.11.2022 पासून सोरतापवाडी या गावाचा पिनकोड 412 202 हा करण्यात आला आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच या डाकघराद्वारे टपाल कार्यालयाच्या विविध
योजनांचा लाभ घ्यावा हि विनंती पुणे ग्रामीण विभागाचे डाक अधीक्षक माननीय श्री. एरंडे यांच्या तर्फे आपणा सर्वाना करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment