*बारामती लोकन्यायालयात 5068 दाखलपूर्व व 222 दाखल प्रकरणामध्ये तडजोड*
बारामती:- बारामती येथील न्यायालयात दिनांक 11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केलेले होते. सदर लोकन्यायालया मध्ये दिवाणी व फौजदारी एकूण 5068 दाखलपूर्व प्रकरणे व 222 दाखल प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. या लोकन्यायालया मध्ये एकूण 6 कोटी 93 लाख 6 हजार 386 रुपयांची वसुली करण्यात आली.
बारामती येथील लोक लोकन्यायालयाचे उदघाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश - 1 श्रीमती. जे. पी.दरेकर साहेब यांनी केले. या लोकन्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जे.ए. शेख साहेब, श्री. आर. के. देशपांडे साहेब, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री. आय. ए. आर. मारचिया साहेब, श्री.एन. आर.वानखडे साहेब, श्री. ए. एम. जोशी साहेब, श्री. एस. एच. अटकरे साहेब व श्रीमती डी. टी. जाधव साहेब यांनी पॅनल प्रमुख म्हनून काम पहिले.या लोकन्यायालयात एकूण 13,769 तडजोडी योग्य प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्या पैकी 5,291 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली.
सदर राष्ट्रीय लोकन्यायालयात अॅड. मिनल देवानंद भंडारे, अॅड. दीपाली व्ही पन्हाळकर,अॅड. एम. बडवे,अॅड. पी. शेंडगे, अॅड. एस. निघोट यांनी पॅनल विधिज्ञ् म्हणून काम पहिले.सदर लोकन्यायालय यशस्वी कारण्यात बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. बी. डी. कोकरे यांच्या सह बारामती बार च्या कार्यकारणीने परिश्रम घेतले. तसेच तालुका विधी सेवा समितीचे मिलिंद देऊळगावकर व इतर कर्मचारी यांनी मोलाचे साहाय्य केले.
No comments:
Post a Comment