नग्न करुन मारहाण करत मारहाणीचा व्हिडिओ काढणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल.. पुणे :- बांधकाम साईटवर जात असताना कामासाठी जाणाऱ्या युवकाला तु आमच्या परिसरात का येतो असे म्हणत मारहाण केली. तसेच त्याला जबरदस्तीने गाडीतून नेत त्याला नग्न करुन मारहाण केली. एवढेच नाहितर नग्न करुन मारहाण करतानाचा व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील मुंढवा परिसरात घडला आहे. हा प्रकार मुंढवा येथील
केशवनगर जॉकवेल ते कुंभारवाडा येथील सार्वजनिक रोडवर 19 डिसेंबर 2022 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. याबाबत खराडी येथे राहणाऱ्या 32 वर्षीय युवकाने शनिवारी (दि. 18) मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार दत्तात्रय जालिंदर गलांडे (वय-35 रा.
केशवनगर, मुंढवा), गणेश जनार्दन गलांडे (वय-32 रा.दळवी हाईट, वडगाव शेरी), अमोल उर्फ बाबू दत्तात्रय गायकवाड (रा. कुंभारवाडा, केशवनगर), पुष्पा जालिंदर गलांडे (वय-55 रा. केशवनगर, मुंढवा), विजय दरेकर (वय-50 रा. स.नं. 5 केशवनगर, मुंढवा) यांच्या विरुद्ध 142, 143,146, 147, 324, 355, 365,323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि
आरोपी दत्तात्रय गलांडे हे एकमेकांच्या ओळखीचे
आहेत. फिर्यादी हे आरोपी राहत असलेल्या परिसरातून बांधकाम साईटवर जात होते.
त्यावेळी आरोपीने त्यांना अडवून तु आमच्या घराच्या परिसरात का येत असतो, तुझा काय संबंध आमच्या परिसरात येण्याचा, असे म्हणून फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच गणेश गलांडे, विकास गलांडे आणि पुष्पा गलांडे यांना बोलावून घेतले. त्यांनी देखील फिर्यादी यांना लाकडी दांडके, बॅट व लोखंडी विळ्याने मारहाण
केली. यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना जबरदस्तीने स्वीफ्ट कार (एमएच 12 8085) बसवून जनसेवा बँकेजवळ घेऊन गेले. याठिकाणी फिर्यादी यांना गाडीतून खाली उतरवून
दत्तात्रय गलांडे आणि अमोल गायकवाड यांनी त्यांच्या अंगावरील कपडे काढून नग्न केले.
तसेच याला मारुन टाका असे म्हणत बेदम मारहाण केली.तर अमोल गायकवाड याने फिर्यादी यांना नग्न करुन मारहाण करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.फिर्यादी यांनी तक्रार देताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.
No comments:
Post a Comment