तुळसण घाटातील दरोडा प्रकरणातील आरोपींना 72 तासात बारामतीतून 5 जणांना अटक..
कराड:- दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आले याबाबत मिळालेली माहिती अशी की,तुळसण घाटात दरोडा
घालून 2 लाख रुपयांची रक्कम
लंपास करणाऱ्या पाच आरोपींना 72
तासात अटक करण्यात आली. कराड
तालुका गुन्हा अन्वेषण शाखेतील
पोलिसांनी संशयित 5 आरोपींना
बारामती तालुक्यातून ताब्यात घेतले
आहे. आरोपींना कराड कोर्टाने
5 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
सुनावली आहे. या प्रकरणात सिताराम
धोत्रे (वय- 27), दिनेश रामचंद्र
धायगुडे (वय- 29, दोघेही रा. अथुर्णे,
ता. इंदापूर), प्रतीक दिलीप रेडे (वय-
21, रा. बारामती), विशाल प्रदिप
कोळेकर (वय - 29, रा. काटेवाडी, ता.
बारामती), अजय महादेव खंडागळे
(वय- 23, रा. भीमटेक, ता. बारामती)
अशी अटक केलेल्या संशयितांची नावे
आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी उमेश रघुनाथ खबाले (रा.
विंग) हे दिनांक 27 रोजी रात्री
आठ वाजता त्यांच्या दत्तगुरु स्टोन
क्रशरवरून दिवसभर झालेल्या
व्यवहाराची रक्कम दोन लाख दोन
हजार घेऊन बोलेरो जीप मधून निघाले
होते. मोटरसायकल वरून आलेल्या
अज्ञात इसमांनी त्यांना अडवून
कोयत्याचा धाक दाखवून पैशाची
पिशवी जबरदस्तीने हिसकावून
पळवून नेली. या घटनेची फिर्याद
तालुका पोलीस ठाण्यात दाखल
झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून
सहाय्यक पोलीस निरीक्षक अली
महंमद मुल्ला यांच्या अधिपत्याखाली
पथक तयार करण्यात आले. या
पथकाने बारामती- वालचंदनगर या
परिसरातून सदर गुन्ह्यातील पाच
आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे
चौकशी केली असता त्यांनी सदर
गुन्हा केल्याचे कबूल केले. या पाचही
आरोपींना अटक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक
बापू बांगर, डीवायएसपी रणजीत
पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव
खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे
प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस
निरीक्षक अली महंमद मुल्ला, पोलीस
हवालदार महेश लावंड, उत्तम कोळी,
पोलीस नाईक सज्जन जगताप, सचिन
निकम, सचिन साळुंखे यांनी केली
आहे.
No comments:
Post a Comment