बारामती मधील होकर्सला हातगाडी गाडे रस्त्याला अडथळा होईल अशा परिस्थितीत न लावण्याचे आवाहन... बारामती:- सर्व हातगाडी धारकांना आवाहन
बारामती शहरामध्ये वाहतूक वाढत आहेत गुणवडी चौक ते इंदापूर चौक व गुणवडी चौकाकडून रिंग रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक हातगाडे भाजीविक्रेते तसेच इतर हॉकर्स सकाळ संध्याकाळ रस्त्यावर आपले दुकाने लावतात. त्यांच्यापुढे ग्राहक गाडीवर उभा राहतो त्यामुळे कायम त्या भागामध्ये रस्त्यात वाहतूक कोंडी होते. सणावाराच्या दिवशी व गुरुवारी तर त्या ठिकाणी चालणे सुद्धा दुरापास्त होते. अनेक छोटे-मोठे अपघात त्यामुळे होत आहेत. सदरचा परिसर हा नो पार्किंग म्हणून घोषित केलेला आहे. तरीसुद्धा वारंवार कारवाई करून सुद्धा सुधारणा होत नाही तरी माझी सर्व होकर्सला विनंती आहे आपण त्या ठिकाणी गाडे रस्त्याला अडथळा होईल अशा परिस्थितीत लावू नये. यापुढे वाहतूक पोलीस व नगरपालिका यांच्यातर्फे यांच्यावर सत्ता कारवाई करण्यात येईल या वाहतुकीच्या अडथळ्यामुळे भविष्यात कदाचित गंभीर अपघात होऊ शकतो त्यामुळे सर्व आकर्षणी सहकार्य करावे ही विनंती.
No comments:
Post a Comment