आयुष्याच्या प्रवासाला योग्य दिशा मिळाली पाहीजे ! - प्रल्हाद पाटोळे* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 7, 2023

आयुष्याच्या प्रवासाला योग्य दिशा मिळाली पाहीजे ! - प्रल्हाद पाटोळे*

*आयुष्याच्या प्रवासाला योग्य दिशा मिळाली पाहीजे ! - प्रल्हाद पाटोळे*

    बरड (प्रतिनिधी) :- आजचा माणूस विज्ञान युगात वावरत असला तरी आयुष्याच्या प्रवासाला जर योग्य दिशा मिळाली नाही तर त्याची दशा व्हायला वेळ लागणार नाही असे उदगार संत निरंकारी मिशन सातारा झोनचे प्रचारक प्रल्हाद पाटोळे (दहिवडी) यांनी काढले.
      बरड (फलटण) येथे  शनिवारी (ता. ४) फलटण शाखेचे मुखी अशोक लामकाने, संदिप लंगुटे ग्रामसेवक  संत निरंकारी चे प्रचारक तथा ग्रामविकास अधिकारी सतीश भोसले , राहूल अबदागिरेजी ( विडणी ) या चौघांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने विशेष सत्संगाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी श्री. पाटोळे यांनी वरील उदगार काढले.
    या सत्संग सोहळ्यास सोपान मांढरे , सेवादल संचालक , गणेश (आबा) झांबरे बारामती , रमेश ननावरे आण्णासाहेब , प्रा . भानुदास गुरव सर , राजेंद्र पवार व बरड परिसरासह फलटण, बारामती, नातेपुते आदी भागातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
    या जनसमुदयाला संबोधित करताना श्री. पाटोळे पुढे म्हणाले, ज्याप्रकारे आदर्श विद्यार्थी घडण्यासाठी आदर्श शिक्षकाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आयुष्याच्या सुखकारक प्रवासासाठी दिशादर्शक व ब्राम्हवेत्ता साधूंची आवश्यकता असते, कारण सद्गुरू हाच अंतिम मार्गदर्शक असतो. यासाठी आध्यात्माची आणि अशा सत्संगाची आवड असणे गरजेचे आहे.
    माणसाच्या जगण्या विषयीचे महत्त्व सांगताना श्री. पाटोळे म्हणाले माणसाचा जन्म झाला की तो मरेपर्यंत जगत असतो, पण आध्यात्म सांगतं की माणूस किती वर्षे जगला याला महत्व नसून तो कसा जगला याला महत्व आहे. कारण आयुष्यातील केलेली कर्म हीच त्या माणसाची खरी कमाई असते. असेही प्रवचनाच्या शेवटी सांगितले. 
     उपस्थितांचे आभार बरड सत्संगचे प्रबंधक यांनी मानले तर उत्कृष्ट मंचसंचालन सतीश भोसले यांनी केले.

No comments:

Post a Comment