धक्कादायक.. टिकावाने पती-पत्नीची निर्घृण हत्या;रक्तबंबाळ अवस्थेत टिकाव रस्त्यावरुन घेऊन जाताना पोलिसांनी केली अटक..
पुणे:-पुण्यात वाढती गुन्हेगारी व कोयता गँगची दहशत काही संपेना तोच पुण्यातील दापोडी परीसरात दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शंकर नारायण काटे (वय-60) आणि संगिता काटे (वय-55) असे हत्या करण्यात आलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. तर प्रमोद मगरुडकर (वय-47) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दापोडीत बेसावध असलेल्या दाम्पत्यावर आरोपीने जमीन खोदण्याच्या टीकावाने घाव घालून हत्या केली. काटे दाम्पत्य घरात बसले असताना आरोपीने त्यांच्यावर घाव घातले. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत आरोपी स्वत:ही जखमी झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत हातात टिकाव घेऊन तो रस्त्याने
फिरताना नागरिकांना दिसला.नागरिकांनी त्याला पकडले. नागरिकांनी याची माहिती भोसरी पोलिसांना दिली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.त्याने दोघांचा खून का केला? याचा तपास भोसरी पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment