काल काय ऐकलं खरं हाय का.! म्हणे दारू बंदी ठराव झालाय तो बरं हायका.! निरा गावातून येणाऱ्या दारूचं वारं तालुक्यात हाय त्याच्यावर कारवाया होणार हाय का..!!! बारामती:- बारामती तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे, अनेक कारवाई होऊनही पुन्हा दारू विक्री होत असताना दिसत आहे, अनेकांचे संसार उघडे पडले असून कित्याकांचे बळी घेले आहे, तर अनेक गावांत अजूनही दारू बंदी ठराव करण्याचा मानस आहे तर अनेकांनी ग्रामपंचायत मध्ये ठराव करून देखील अवैध दारू विक्री चालूच आहे, तर नुकताच वाघळवाडी ग्रामपंचायत मध्ये दारू बंदी ठराव करण्यात आला याला गावातील पुढारी,ग्रामस्थ, महिला भगिनी यांनी साथ दिली तर हा ठराव करण्यासाठी प्रदीप मांगडे यांनी प्रयत्न केला असल्याचे सांगितले, पण ठराव झाला खरा पण तो किती काळ चालेल व त्याची अंमलबजावणी किती काळापर्यंत होईल हे पाहणे औचित्याचे ठरेल अशीच जनजागृती प्रत्येक गावात जिथे दारू विक्री चालू आहे अश्या ठिकाणी होणं गरजेचं आहे, हॉटेल, ढाबा, घरगुती, टपरी,निर्जन स्थळी अश्या अनेक ठिकाणी हातभट्टी, लिकर ,संत्रा,क्वॉटर,ताडी,गांजा सारखे अमली पदार्थ खुलेआम विकले जाते, तर निरा,जेजुरी,बारामती या गावातून अवैध दारू सप्लाय होत असल्याने याकडे उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष देत असल्याचे अनेक तक्रारी अर्ज केल्याने कारवाई न झाल्याने दिसून येत असले तरी लवकरच मुख्यमंत्री, गृहमंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्या लेखी तक्रारी दाखल होऊन संबंधितावर कारवाई होणार असल्याचे कळतंय.ही अवैध दारू दुसऱ्या तालुक्यातून आपल्या हद्दीत येत आहे हे माहीत असून सुद्धा फक्त छोटे छोटे विक्रते वर कारवाई मात्र मूळ सप्लाय करणारा मालक मोकाट याच्या मागे काय गौडबंगाल आहे हे लवकरच बाहेर येईलच तोपर्यंत आपल्या भागात आजूबाजूला चालू असणाऱ्या अवैध दारू विक्री ची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जागृत नागरिक व महिला भगिनी यांनी द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे व माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून बातमी प्रसिद्ध केल्या जातील .
Post Top Ad
Thursday, February 9, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
काल काय ऐकलं खरं हाय का.! म्हणे दारू बंदी ठराव झालाय तो बरं हायका.!! निरा गावातून येणाऱ्या दारूचं वारं तालुक्यात हाय त्याच्यावर कारवाया होणार हाय का..!!!
काल काय ऐकलं खरं हाय का.! म्हणे दारू बंदी ठराव झालाय तो बरं हायका.!! निरा गावातून येणाऱ्या दारूचं वारं तालुक्यात हाय त्याच्यावर कारवाया होणार हाय का..!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment