सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी आयोजित विशेष मोहिमे मध्ये पुणे ग्रामीण विभागाची उत्कृष्ट कामगिरी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 15, 2023

सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी आयोजित विशेष मोहिमे मध्ये पुणे ग्रामीण विभागाची उत्कृष्ट कामगिरी..

सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी आयोजित विशेष मोहिमे मध्ये पुणे ग्रामीण विभागाची उत्कृष्ट कामगिरी..
पुणे:-भारत सरकारने २०१५ मध्ये बेटी बचाव बेटी पढाव  अभियान मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरु केली होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 9 व 10 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतामध्ये 7.5 लाख सुकन्या समृद्धी
अकाउंट सुरू सुरू करण्याची विशेष मोहीम पोस्ट ऑफिस मार्फत राबवली गेली यामध्ये संपूर्ण भारतामध्ये सुमारे १० लाखाहून अधिक सुकन्या खाती उघडल्या गेली. पुणे ग्रामीण डाक विभागाने ४२५५ सुकन्या खाती उघडून पुणे क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवला. या मध्ये सौ. राजेंद्र, सबपोस्टमास्तर चाकण, सौ जाधव
सबपोस्टमास्तर जुन्नर, व सौ वर्षे सबपोस्टमास्तर आळंदी यांनी अनुक्रमे १५३,१२३ व १२१ सुकन्या खाते उघडून चांगली कामगिरी केली असे श्री बी पी एरंडे,अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग यांनी सांगितले.श्री बेनकेसाहेब आमदार जुन्नर, श्री किरण हेमाडे माजी सरपंच वडेश्वर, श्री
प्रशांत कंजे, श्री राहुल साबळे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय अकोला, (बॅच १९८९ -९३) यांनी स्वखर्चानी गरजू मुलींचे सुकन्या खाते उघडून विशेष सहकार्य केले त्याबद्दल श्री एरंडे यांनी त्यांचे आभार मानले व सर्व नागरिकांनी आपल्या
वाढदिवसानिमित व इतर समारंभानिमित्त आपल्या गावातील गरजू मुलींचे सुकन्या
खाते उघडून द्यावे असे आवाहन श्री एरंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment