शिक्षक अधिवेशनकाळात एकही जिल्हा परिषद शाळा बंद राहणार नाही,कुणाचा आला आदेश.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 14, 2023

शिक्षक अधिवेशनकाळात एकही जिल्हा परिषद शाळा बंद राहणार नाही,कुणाचा आला आदेश.!

शिक्षक अधिवेशनकाळात एकही जिल्हा परिषद शाळा बंद राहणार नाही,कुणाचा आला आदेश.!                                                                           पुणे:- १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत ही शिक्षक अधिवेशने होणार आहेत त्यादरम्यान शाळा बंद न ठेवण्याचा पुणे जिल्हा परिषदेचा आदेश देण्यात आला,पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना केवळ शिक्षक अधिवेशनास जाण्यासाठी रजा मंजूर केली जाईल. परंतु एकाच शाळेवरील सर्वच्या सर्व शिक्षकांना सरसकट या रजा घेता येणार नाहीत.पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना केवळ शिक्षक अधिवेशनास जाण्यासाठी रजा मंजूर केली जाईल. परंतु एकाच शाळेवरील सर्वच्या सर्व शिक्षकांना सरसकट या रजा घेता येणार नाहीत.शिक्षकांनी याबाबतचे योग्य नियोजन करावे आणि अधिवेशनकाळात एकही जिल्हा परिषद शाळा बंद राहणार नाही, याचे योग्य नियोजन करावे, असा आदेश
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शाळांना दिलाआहे,केवळ अधिवेशनासाठी जाणाऱ्या शिक्षकांनीच रजा
घ्यावी. मात्र अधिवेशनाच्या नावाखाली रजा घेऊन,इथेच फिरणाऱ्या शिक्षकांची रजा मंजूर केली जाणार नाही. शिवाय जे शिक्षक अधिवेशनात जातील, त्यांनाच ही रजा मंजूर केली जाईल. यासाठी अधिवेशनातील
उपस्थिती ग्राह्य धरण्यात येईल. या उपस्थिती
पत्रकाच्या आधारे आधारे सेवा पुस्तिकेत नोंद
करण्याच्या हालचाली जिल्हा परिषद प्रशासनाने सुरु केल्या आहेत. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या दोन संघटनांच्यावतीने दोन स्वतंत्र शिक्षक अधिवेशनांचे आयोजन करण्यात
आले आहे. यानुसार येत्या १५ ते १७ फेब्रुवारी या
कालावधीत ही शिक्षक अधिवेशने होणार आहेत.
त्यानंतर १८ फेब्रुवारीला महाशिवरात्री तर, १९
फेब्रुवारीला रविवारची सुट्टी जोडून आली आहे. यामुळे अधिवेशनकाळातील तीन दिवस आणि सरकारी सुट्यांचे दोन दिवस मिळून सलग पाच दिवस शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी हा आदेश दिला आहे.

No comments:

Post a Comment