यशवंतराव चव्हाण सेंटर देणार मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 20, 2023

यशवंतराव चव्हाण सेंटर देणार मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार..

*यशवंतराव चव्हाण सेंटर देणार मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार*

*पुण्याच्या रिलायन्स स्टोअरसाठी नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन*

पुणे, दि.२० (प्रतिनिधी) -  यशवंतराव चव्हाण सेंटरने आता समाजातील मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार मिळवून देण्याचे ठरवले आहे. रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या सहकार्याने अशा व्यक्तींना  नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच रिलायन्स स्मार्ट बाजार आणि रिलायन्स स्मार्ट स्टोअर्स मध्ये अशा व्यक्ती नोकऱ्या करताना दिसतील, अशी माहिती खासदार सुळे यांनी दिली. त्यांच्या कल्पनेला रिलायन्स रिटेल लिमिटेडने सकारात्मक प्रतिसाद दिला असून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिलायन्स स्मार्ट स्टोअरच्या संयुक्त विद्यमाने हे संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील औंध, वाकड, हिंजवडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, गायकवाड नगर, पाषाण, फातिमा नगर, मांजरी, कल्याणी नगर, बीटी कावडे, वाघोली, खराडी, चाकण, आळंदी, मोशी, एरंडवणे, वारजे, नऱ्हे या ठिकाणच्या रिलायन्स स्टोअर्स मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

इच्छुकांनी अर्ज केल्यानंतर योग्य उमेदवार निवडून त्यांना पुण्यातील रिलायन्स स्मार्ट बाजार, रिलायन्स स्मार्ट स्टोअर्समध्ये ट्रेनी कस्टमर सर्व्हीस असोसिएट पदी नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी शिक्षणाची बारावी पास ही अट ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर मुलाखती दरम्यान १२ वी पास प्रमाणपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, कोरोना लसीकरण प्रमाणपत्र, PAN कार्ड, आधार कार्ड, बँकेचे खाते, पासपोर्ट फोटो या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. बारावी पास झालेल्या इच्छुकांनी आपली नावे यशवंतराव चव्हाण सेंटरकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरणे शक्य झाले नाही, त्यांनी स्वतःचा बायोडाटा येत्या २१ फेब्रुवारी रोजी पुण्यातील "निसर्ग कार्यालय" येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जमा करावा. अधिक माहितीसाठी ८१६९४९३१६१, ८००७१८२५१० या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment