बारामती तालुक्यात मोठी कारवाई;हातभट्टी निर्मिती साहित्यसह एकुण रु.५७१२००/- रू
किंमतीचा मुद्देमाल जप्त.. बारामती:- निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड विभाग जि. पुणे या विभागाची मोठी कारवाई अवैद्य गावठी हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुक करणाऱ्यावर एकुण 3 गुन्हे नोंद केले असून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली असून दोन चारचाकी वाहनांसह केलेल्या कारवाईत ५७१२००/- चा मुद्देमाल जप्त
करण्यात आला, दि. ८ फेब्रुवारी २०२३ मध्ये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, जि. पुणे यांनी त्यांच्या सर्व स्टाफ सह बारामती तालुक्यातील निबुंत गावच्या हद्दित ता. बारामती जि.पुणे परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री वाहतुक करणा-या
विविध ३ ठिकाणी छापे टाकुण वारस एकुण ३ गुन्हे नोंद केले असून ३ आरोपी अटक
करण्यात आलेले आहेत.यावेळी रसायण ६००० लिटर, गावठी हातभट्टी दारू १५५० लिटर,
चारचाकी वाहन २ तसेच हातभट्टी निर्मिती साहित्य असा एकुण रु.५७१२००/- रू
किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप आयुक्त पुणे श्री चासकर व अधीक्षक पुणे श्री राजपुत यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. श्री प्रविण पोळ निरीक्षक तसेच या कारवाईत दुय्यम निरीक्षक श्री डी. बी. पाटील, दुय्यम निरीक्षक श्री. एस. एल. मांजरे, पुढील प्रमाणे सर्व स्टाफसह श्री.विकास थोरात, श्री वामन माळी श्री. अशोक पाटील, श्री शुभम भोईटे,जवान नि. वाहन चालक श्री केशव वामने यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम
निरीक्षक श्री डी. बी. पाटील हे करत आहेत.
No comments:
Post a Comment