७ लाखांची लाच मागणारा जलसंपदा विभागाचा उपविभागीय अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात..
पुणे:-लाचखोरीचे प्रमाणात वाढ होत असतानाच नुकताच पूर रेषेच्या आत जमिनीचे सपाटीकरण केल्याने कारवाईची भिती दाखवून ७ लाखांची लाच मागून त्यापैकी साडेतीन लाख रुपये
स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने
जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. तुळशीदास आश्रु आंधळे (वय ५७) असे या उपविभागीय अधिकाऱ्याचे नाव आहे. आंधळे हा भामा
आसखेड सिंचन व्यवस्थापनच्या खेड तालुक्यातील करंजविहीरे या उपविभागात कार्यरत आहे. तक्रारदार यांचा जमीन खरेदी विक्री तसेच जमीन / प्लॉट डेव्हलप करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी खेड तालुक्यातील
कोळीए येथील जमिनीचे सपाटीकरण व डेव्हलपमेंटचे काम सुरु केले आहे. या ठिकाणी जलसंपदा विभागातील भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे उप अभियंता तुळशीदास आंधळे यांनी भेट दिली व पाहणी केली. पूर रेषेच्या आतमध्ये सपाटीकरण व डेव्हलपमेंटचे काम केले असून त्यावर
रितसर कारवाई करणार असल्याबाबत कळविल्याचे आंधळे याने तक्रारदार यांना सांगितले. कारवाई न करण्यासाठी त्याने ७ लाख रुपयांची लाच मागितली.तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची गुरुवारी पडताळणी केली
तेव्हा त्यांनी ७ लाख रुपयांची मागणी करुन त्यापैकी साडेतीन लाख रुपये शुक्रवारी घेऊन येण्यास सांगितले.त्यानंतर आंधळे यांनी तक्रारदार यांना गणेशखिंड रोडवरील मोदीबाग येथील पेट्रोल पंपावर पैसे घेऊन येण्यास बोलावले. त्यानुसार पोलीस अधीक्षक अमोल
तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे, प्रविण निंबाळकर, पोलीस शिपाई सचिन वाझे, चेतन भवारी, रियाज शेख, दामोदर जाधव
यांनी पेट्रोल पंपावर सापळा रचला तक्रारदाराकडून आंधळे याने साडेतीन लाख रुपये स्वीकारल्यानंतर तो रस्ता ओलांडून पलीकडे जात असतानाच त्याला पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment