जेष्ठ नागरिकांना ६५ वर्षापर्यंत बससेवा मधे विनामूल्य सवलत मिळणेबाबत मागणीचा विचार व्हावा - कल्याणी वाघमोडे
बारामती :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परिपत्रक क्रमांक -८/२०२२ नुसार राज्यातील ७५ वर्षा वरील जेष्ठ नागरिकांना बससेवा प्रवास भाड्या मधे 100 % सवलत देण्याचे घोषित केले आहे. परंतु ही वयोमर्यादा 75 वर्षावरून कमी करून 65 वर्ष करावी अशी मागणी विधानपरिषदचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या कडे क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी केली आहे .तसेच मुख्यमंत्री ,परिवहन मंत्री ,विरोधी पक्ष नेते यांच्या कडेही निवेदन पाठविण्यात आले आहे .
या जेष्ठ नागरिक योजना मधे 75 वर्षा पुढील नागरिकांना मोफत तर 65 ते 75 दरम्यानच्या नागरिकांना बस सेवेत 50 % सवलत देण्यात येत आहे .परंतु जेव्हा निम्न व मध्यम आर्थिक गटातील जेष्ठ नागरिकांचा प्रश्न येतो ,तेव्हा त्यांच्यासमोर एसटीच्या प्रवासाशिवाय अन्य कुठलाही मार्ग नसतो . केंद्र व राज्याच्या सर्व शासकीय ,निमशासकीय कार्यालये यामध्ये देखील जेष्ठ नागरिक वयोमर्यादा 60 वर्ष असते . साधारणपणे निवृत्तीनंतर सुरुवातीच्या वर्षामध्ये तब्येतीची स्थिती उत्तम असल्याने फिरण्यासाठी हा सर्वोत्तम वयोगट आहे . वय वर्ष 75 पर्यंत तब्बेत पूर्णपणे साथ देत नाही अनेक आरोग्य विषयक बाबींना जेष्ठ नागरिकांना सामोरे जावे लागते , मात्र एसटीच्या प्रवासात सवलतीत प्रवास करता येत नसल्याने जेष्ठ नागरिकांची मोठी अडचण होते .त्यामुळे 60 वर्ष असलेल्या नागरिकांना प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत मिळायला हवी .तसेच 65 वर्ष असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत बस सेवा देण्यात यावी .
दुसरीकडे जेष्ठ नागरिकांना एसटीच्या संदर्भात स्मार्ट कार्ड योजना भेडसावते .लांबच लांब रांगेत नागरिकांना यासाठी उभे राहावे लागते ,त्यामुळे जेष्ठ नागरिक याकडे पाठ फिरवतात .ऐरवी अनेकदा अनेक मार्गांवर बस रिकाम्या धावतात ,पण जर सवलतीत प्रवास करणारे जेष्ठ नागरिक एसटीने प्रवास करणार असतील तर ते एसटीला नकोय का ,असे मत जेष्ठ नागरिक व्यक्त करताना दिसतात .त्यामुळे या विषयावर सभागृहामधे अधिवेशनात या विषयावर चर्चा होऊन जेष्ठ नागरिकांना 60 ते 65 वयानुसार पूर्णपणे सवलत मिळावी ,असे मत कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केले .
No comments:
Post a Comment