संतापजनक..तीन वर्षाच्या मुलीवर हात बांधून अत्याचार,माणुसकीला काळिमा फासणारी घटना.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 22, 2023

संतापजनक..तीन वर्षाच्या मुलीवर हात बांधून अत्याचार,माणुसकीला काळिमा फासणारी घटना.!

संतापजनक..तीन वर्षाच्या मुलीवर हात बांधून अत्याचार,माणुसकीला काळिमा फासणारी घटना.!

बीड:- महाराष्ट्रात हादरवणारी घटना घडली एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर हात बांधून अत्याचार
करण्यात आले आहेत. मुलगी रस्त्यावर आपल्या
आईसोबत भीक मागत बसलेली असताना हा
भयंकर प्रकार घडल्याचे कळते. नराधमाने क्रीडा संकुलातील शौचालयात चिमुरडीवर बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीनास ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी आपल्या अंध आईसोबत रस्त्यावर भीक मागते. काल रात्री मुलगी आपल्या आईच्या शेजारी खेळत असताना अल्पवयीन आरोपीने पैसे दाखवत तिला जवळ बोलावलं. यानंतर त्याने तिला संभाजी महाराज क्रीडा
संकुलातील शौचालयात नेलं आणि हात बांधून
अत्याचार अत्याचार केले.मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तेथून जाणाऱ्या काही पादचाऱ्यांनी जाऊन पाहिले असता त्याने पळ
काढला. पीडित मुलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग
असल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचं लक्षात आलं.नागरिकांनी त्याचा पाठलाग करत त्याला
पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो हाती लागला
नाही.या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी ताबडतोब पोहोचले. मुलीला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरु आहेत. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.यानंतर पोलीस अधिकारी रात्रभर पोलीस ठाण्यात थांबून होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

No comments:

Post a Comment