*महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांचे थकीत विजबील माफ करा- राष्ट्रीय समाज पक्ष*
बारामती:- महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांचे थकीत विजबील माफ करून विज पुरवठा तत्काळ सुरू करावा, या मागणी संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतिने बारामती तहसीलदार यांना निवेदण देण्यात आले आहे, या वेळेस तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर यांनी सांगीतले महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सद्यस्थितीत फार अडचणीत आहे, शेतात उभी पिके आहेत, शेतकर्याच्या हाता तोंडाशी आलेला घास या महावितरण च्या चुकीच्या धोरणामुळ मातीत जाणार आहे,
महावितरण विज कनेक्शन कट करत आहे, ट्रान्सफॉर्मर सोडवत आहे, या मुळे शेतकर्यावर खुप मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे, तरी या निवेदनातून राज्याचे उपमुख्यमंञी, व उर्जा मंञ्यानकडे आमची मागणी आहे
1) शेतकर्याचे थकीत विजबील माफ करावे
2)शेतकर्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास विज देण्यात यावी,
3) शेतकर्यांना शेतीसाठी मोफत विज देण्यात यावी या प्रमुख मागण्या आहेत, लवकरात लवकर या मागण्यांची गांभिर्याने दखल घ्यावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष संपुर्ण महाराष्ट्रभर शेतकर्यासाठी जनआंदोलन उभा करेल,या संदर्भात तहसीलदार यांना निवेदण देण्यात आले या वेळेस, जिल्हाध्यक्ष संदिप चोपडे,तालुकाध्यक्ष अँड.अमोल सातकर, विठ्ठल देवकाते, शैलेश थोरात, श्याम घाडगे, महादेव कोकरे, किशोर सातकर,घनश्याम देवकाते, निखील दांगडे आदी पदाधीकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment