खळबळजनक..शरद पवारांचे निकटवर्तीय बडे उद्योजक अनिरूध्द देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा..!
पुणे : -नुकताच आयकर विभागाचा छापा पडल्याची खळबळ जनक बातमी आली याबाबत मिळालेली माहिती अशी की,राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आयकर विभागाने पुण्यात सहा ठिकाणी छापेमारी केली असून यामध्ये देशपांडे यांच्या
कार्यालयाचाही समावेश आहे. या धाडसत्रातून काय निष्पन्न होणार, हे पहावे लागेल. अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांच्या जवळच्या वर्तुळातील असल्याने आयकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आयकर विभागाने मंगळवारी बीबीसी वृत्तसंस्थेच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयामध्ये सर्वेक्षण केले. यानंतर बुधवारी पुण्यातील बडे उद्योजक सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा
अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. त्यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशपांडे यांच्या कार्यालयासह घर आणि इतर ठिकाणी आयकर विभागाकडून तपासणी केली जात आहे. देशपांडे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment