अंगणवाडी कर्मचारी संघटनाचा दि.२० फेब्रुवारी पासून भव्य मोर्चा व बेमुदत संप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 19, 2023

अंगणवाडी कर्मचारी संघटनाचा दि.२० फेब्रुवारी पासून भव्य मोर्चा व बेमुदत संप..

अंगणवाडी कर्मचारी संघटनाचा दि.२० फेब्रुवारी पासून भव्य मोर्चा व बेमुदत संप..                                                             बारामती:-अंगणवाडी कर्मचारी संघटना बारामती तालुका महाराष्ट्र राज्य.यांच्या वतीने मा.बालविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना बारामती प्रकल्प क्रं. १ व २ यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की,अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने दिनांक २०/०२/२०२३ रोजी
पासून राज्यव्यापी काम बंद हाक दिल्यामुळे आम्ही पूर्ण तालुका यात सहभागी होत असून आम्ही दिनांक २० फेब्रुवारी सोमवार या दिवशी सकाळी ११.वाजता शारदा प्रांगण येथून निघुन पुढे भिगवणचौक इंदापूर चौक गुनवडी चौक गांधी चौक सुभाष चौक भिगवणचौक ते बारामती नगरपरिषद येथे निवेदन देवून पुढे बारामती पंचायत समिती येथे मोर्चा येवून अधिकारी यांना निवेदन देवून मान्यवर व अंगणवाडी सेवीका यांचे मनोगत होऊन अडचणी सांगितल्या जातील व त्यानंतर सभेची व मोर्चाची सांगता होईल.तरी राज्य व केंद्र शासनाने २०१७ सालापासून अंगणवाडी कर्मचारी यांचेवर अन्याय केलेला आहे. आमच्या सेवीका मदतनीस या सतत
सुपरवायझरच्या दबावाखाली वावरत असतात व अन्याय सहन करतात बारामती तालुका हा असा तालुका आहे की, सुपरवायझर हे सेवीका व अंगणवाडीका यांचे वयाचा देखील विचार करीत नाहीत. सेवीका मदतनीस हया सुपरवायझरच्या दबावाला घाबरून हृदयविकार, उच्चरक्तदाब, मधुमेह तणावग्रस्त होवून त्याचे प्रमाण वाढत आहे.तरी मेहेबरबान साहेबांनी अंगणवाडी सेवीका, मदतनीस मिनी अंगणवाडी हया तुटपुंज्या मानधनावर काम करीत असुन, हे कुठे तरी थांबलेच पाहिजे प्रत्येक वेळेस बारामती तालुक्यात ५ मिनीट उशीर झाला, एखादे रजिस्टर
लिहायचे राहिले, काही सेवीका मदतनीस चुकले तरी कार्यालय हे नोटीस देतात व नोटीसीचे उत्तर दया नाहीतर तुम्ही हे केले नाही ते केले नाही
तर घरी बसवीन व कामावरून काढुन टाकीन अशा प्रकारच्या धमक्या ठराविक काही सुपरवायझर देतात व आमच्यावर घोर अन्याय करतात.आमचा लढा राज्य व केंद्र सरकारशी आहे प्रशासनाशी नाही आम्हाला चांगला मोबाईल, भरीव मानधनात वाढ, मराठी भाषेतील ॲप हया मुख्य मागण्या असुन त्या वरिष्ठां पर्यंत पोहचवण्याची विनंती करीत असल्याचा मागणीचे निवेदन अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र
पुणे जिल्हा, पुणे व अंगणवाडी कर्मचारी संघटना बारामती तालुका महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आले यावेळी निवेदनावर अध्यक्ष सह वरीष्ठ पदाधिकारी व महिला सदस्यांनी सह्या करून दिल्या.

No comments:

Post a Comment