पार्लरसाठी आली,दागिने चोरी केली..पोलिसांनी महिलेसह मुद्देमाल केला जप्त..!
बारामती:- चोरीचे प्रमाणात वाढ होत असताना कारवाई ही देखील तेवढ्याच धडाडीने होताना दिसत आहे, नुकताच एका घरफोडीचा तपास केला आहे, तर तेजस्विता स्वप्निल जरांडे वय 32 वर्ष व्यवसाय पार्लर राहणार मळद रोड देवळे पॅराडाईज फ्लॅट नंबर8 या महिला संसाराला हातभार लागावा म्हणून घरामध्ये लेडीज पार्लर चालवत आहेत. त्यांच्या घरात आजूबाजूच्या महिला पार्लरसाठी येत असतात त्यामुळे त्यांच्या घरात साहजिकच महिलांचा वावर असतो. त्यांच्या घराच्या दोन चाव्या असतात एक चावी कायम घराच्या खुंटीवर लटकवलेली असते एक चावी त्या स्वतःजवळ ठेवतात त्यांची घरात ठेवलेली चावी ही एक दिवस गायब झाली. दिनांक 23 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान त्या कामानिमित्त त्यांच्या मूळ गावी गेलेल्या होत्या घरामध्ये कुणीही नव्हते. घरातील कपाटाची चावी घरामध्येच होती घरातील त्यांचे दागिने कपाटात होते
दिनांक 28 जानेवारी रोजी त्या परत आल्या व त्यांनी घरात पाहिले असता त्यांच्या कपाटातील दागिने त्यांना मिळून आले नाही मग त्यांनी दुय्यम चावी पाहिले असता तीही घरात मिळून आली नाही मग त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या घरातील दुय्यम चावी कोणीतरी वापर करून दरवाजा उघडून घरातील कपाटाच्या चावी चा वापर करून कपाटातील 14ग्रॅम सोन्याचे गंठण 5.6 ग्रॅम सोन्याची चैन 2.6ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स. कपाटात ठेवलेले रोख 5 हजार घरातून चोरी झालेल्या आहेत त्यानंतर त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यास तक्रार दिली
पोलिसांनी तात्काळ घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला . त्यांच्या घरात अनेक महिला येत असल्याने महिलांकडे कौशल्यपूर्ण तपास करणे तशी अवघड गोष्ट होती अनेक महिलांना चौकशीसाठी बोलावे लागले . महिलांकडे चौकशी म्हटल्यानंतर जास्त पॉलिसी खाक्या व भाषा वापरता येत नाही परंतु पोलिसांनी कसोशीने चौकशी केली असता शेजारील परिसरात राहणारे महिलेनेच पार्लरमध्ये आले असताना फिर्यादीचे लक्ष नसताना घरातील चावी घेऊन गेल्या व त्यांच्या अनुपस्थितीत घर उघडून वरील वर्णनाचे 82हजार रुपयांचे दागिने व पैसे घेऊन गेल्या असे निष्पन्न झाले सदर महिलेस पोलिसांनी अटक केली माननीय प्रथम वर्ग न्यायाधीश पाटील मॅडम यांच्याकडून सरकारी वकील राहुल सोनवणे यांनी व्यक्तिवाद करून सदर महिलेची पोलिस कस्टडी घेऊन पोलीस कस्टडीमध्ये तिच्याकडे चौकशी करून वरील प्रमाणे चोरीस गेलेला सर्व ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. सदरचा सोन्याचे दागिने सदर महिलेने पुण्यामध्ये एका घाणवट ठेवण्यासाठी दिले होते व त्याच्याकडून ती पैसे घेऊन आलेली होती
सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, दशरथ इंगवले, अक्षय शिताप, जामदार, शाहू राणे व लोकरे मॅडम यांनी केलेला आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर महिलेस पैशाचे आवश्यकता होती परंतु सदर महिलेने लोभपोटी सदर दागिने चोरणे व त्यातून कर्ज काढणे तिला खूप महाग पडले. हा शॉर्टकट तिने न वापरता कष्ट करून बचतीचा मार्ग अवलंबिला असतात तर स्वाभिमानी राहिला असता आणि आरोपही आला नसता.
No comments:
Post a Comment