डॉक्टर,नर्ससह पाच जणांनी अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्या विधवेचे बाळ विकले,गुन्हा दाखल.!
नागपूर :-डॉक्टर कडे देव माणूस म्हणून पाहिले जाते पण एका ठिकाणी नर्स सह इतर पाच जणांच्या सहभागाने जे केलं ते धक्कादायक होतं याबाबत मिळालेली माहिती अशी की, पतीचा खून झाल्यानंतर विधवा महिलेचे एका
नातेवाईकाशी सूत जुळले.या प्रेमसंबंधातून तिला गर्भधारणा झाली. ती गर्भपात करण्याच्या तयारीत असताना श्वेता सावळे च्या टोळीने
तिची प्रसूती करून नवजात बाळाची परराज्यात पाच लाख रुपयांत विक्री केली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने डॉक्टर, नर्ससह पाच जणांवर गुन्हे दाखल केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, कोराडीमध्ये राहणारी ३० वर्षीय पीडित महिलेच्या पतीचा खून झाला. तेव्हापासून ती एकटी राहत होती. नातेवाईक असलेला विवाहित युवक तिच्या घरी यायला लागला. त्याची पत्नीसुद्धा प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यामुळे तोसुद्धा एकटा होता. त्यांचे सूत जुळले. दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महिला गर्भवती झाली.
ती सप्टेबर २०२१ मध्ये आरोपी डॉ. नितेश मौर्य (३७ रा.मनीष नगर, सोमलवाडा) याच्या रुग्णालयात गेली.तेथे रेखा पुजारी (रा. नारा रोड, निर्मल कॉलनी) या परिचारिकेने तिला विश्वासात घेतले. डॉ. मौर्य आणि रेखा यांनी या महिलेला नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीची प्रमुख श्वेता सावळे ऊर्फ आयशा खान हिच्याकडे पाठविले. आयेशाचा पती मकबूल खान,
दलाल सचिन रमेश पाटील यांनी तिला सूनेसाठी बाळ दत्तक घ्यायचे असल्याचे सांगून बाळाला जन्म देण्यास भाग पाडले. मार्च २०२२ मध्ये आयेशाने या महिलेला बालाघाटमधील एका रुग्णालयात बळजबरी शस्त्रक्रिया करून बाळ काढले व अवघ्या दोन दिवसांच्या बाळाला
परप्रांतात पाच लाखांत विकले.नवजात
बाळांच्या विक्रीची माहिती गोळा केली. त्यात
आयेशाच्या टोळीने आणखी बाळाची विक्री केल्याचे लक्षात आले. संकपाळ यांनी लगेच डॉ. सुनील मौर्य आणि रेखा पुजारी यांची चौकशी केली. रेखा हिने आयेशाच्या मदतीने बाळ विकल्याची कबुली दिली.
No comments:
Post a Comment