धक्कादायक..भूतबाधा केल्याच्या संशयावरुन आठ ते दहा कुटुंबांना जबरदस्तीने सोडावं लागलं गाव..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 5, 2023

धक्कादायक..भूतबाधा केल्याच्या संशयावरुन आठ ते दहा कुटुंबांना जबरदस्तीने सोडावं लागलं गाव..!

धक्कादायक..भूतबाधा केल्याच्या संशयावरुन आठ ते दहा कुटुंबांना जबरदस्तीने सोडावं लागलं गाव..!                                                          नाशिक :भुताटकी केली जात असल्याचे कारण देत सातत्याने होणाऱ्या छळास वैतागून आठ, दहा कुटुंबांना सोडावं लागलं गाव याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिकच्या इगतपुरीमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अंधश्रद्धेचा डोकं बधिर करणारा धक्कादायक प्रकार समोर आलाय.भूतबाधा केल्याच्या संशयावरुन आठ ते दहा कुटुंबांना गाव सोडण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली आहे.इगतपुरीच्या धारगावमधल्या भोरवाडी आदिवासी पाड्यावर एका लहान बालकाचा मृत्यू झाला. मात्र, या बालकाचा मृत्यू भूतबाधा केल्यानं झाल्याचा आरोप करत एका कुटुंबाने इतर आठ कुटुंबांची झोप उडवली. हे कुटुंब नेहमी शिवीगाळ करुन भांडण उकरून काढत होतं. अखेर या आठ कुटुंबांना राहतं घर सोडण्यास सांगण्यात आले आहे. परिस्थितीसमोर हतबल या आठ कुटुंबांनी घराची मोडतोड करत पाठीवर संसार घेत स्थलांतराला सुरुवात केली. पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा हा प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली.मुलाच्या मृत्यूनंतर भुताटकी केली जात असल्याचे कारण देत सातत्याने होणाऱ्या छळास वैतागून इगतपुरी तालुक्यातील भोरवाडी येथील आठ कुटुंबांनी
आपल्या घरांची मोडतोड करीत स्थलांतर केले आहे.या प्रकारामुळे तालुक्यातील आदिवासींच्या
मानगुटीवरील अंधश्रद्धेचे भूत अजूनही कायम
असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.नेमका काय आहे प्रकार भोरवाडी येथील एका कुटुंबातील आजारी असणाऱ्या बालकाचा मागील महिन्यात मृत्यू झाला. भुताटकी केल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत या परिवाराने गावात आठ कुटुंबांचा छळ सुरू केला.सातत्याने होणाऱ्या वादास वैतागलेल्या या आठ
कुटुंबांनी अखेर वाद वाढल्याने याबाबत घोटी पोलिसांत धाव घेतली आणि आता गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.या गावातील लक्ष्मण धापटे, सोमा शिदे, भाऊ पादिर,सनू पादिर, गंगूबाई खडके, शांताराम खडके यांच्यासह अन्य दोन कुटंबांनी आपल्या राहत्या घरांची मोडतोड करीत पाठीवर संसार साहित्य घेत स्थलांतर केले. या प्रकारामुळे इगतपुरी तालुक्यातील अंधश्रद्धेच्या प्रकाराची नव्याने चर्चा सुरु झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली कठोर कारवाईची मागणी केली,इगतपुरी तालुक्यातील भूतकाळ भूताटकीच्या प्रकाराने छळ झाल्याने ग्रामस्थांनी घर सोडून पलायन केले. या घटने विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे. संपूर्ण प्रकाराची चौकशी करून आरोप करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर, स्थानिक महिलांनीही याबाबत न्याय देण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment