"हौसेला मोल नाही"..चक्क थाटामाटात केला कुत्र्याचा(श्वान) वाढदिवस कुरकूंभ :- कोण काय करेल याचा नेम नाही म्हणतात ना "हौसेला मोल नाही" अशीच आगळी वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला सर्व काही साजेशा असा थाटामाटात वाढदिवस करण्यात आला पण तो काही कोण्या पुढारी, भाई, दादा, नेता,उदयोजक किंवा सामाजिक कार्यकर्तेचा नव्हे तर चक्क पाळलेल्या एका लाडक्या कुत्र्याचा होय बॅनर बाजी डीजे लावून कुरकुंभ गावातील रहिवासी गायकवाड यांच्या कुटुंबातील त्यांचा लाडका श्वान जॅक याचा प्रथम वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला .लाडक्या जॅकच्या वाढदिवसाची चर्चा पूर्ण दौंड तालुक्यात होत आहे . वाढदिवसानिमित्त जॅकला नवीन कपडे घालून ,केक कापून ,डीजे लावून व लहान मुलांच्या डान्स कॉम्पिटिशन ठेवून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी सिद्धार्थ गायकवाड ,जयदीप पारधे,उदय गायकवाड ,महेश शिंदे यांच्यासह मित्रपरिवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ,आमचा लाडका जॅक आमच्या कुटुंबातील एक सदस्य असून याचा प्रथम वाढदिवस आणि धुमधडाक्यात साजरा केला अशी माहिती जयदीप पारधे यांनी दिली.
Post Top Ad
Monday, February 20, 2023
"हौसेला मोल नाही"..चक्क थाटामाटात केला कुत्र्याचा(श्वान) वाढदिवस..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment